शिंदेंची सगळी शक्ती ठाकरेंना रोखण्यातच जाणार; लोकसभेसाठी महाराष्ट्रात कोण कुणाच्या विरोधात…

शिंदेंची सगळी शक्ती ठाकरेंना रोखण्यातच जाणार; लोकसभेसाठी महाराष्ट्रात कोण कुणाच्या विरोधात…

Lok Sabha Election : शिवसेनेत बंड करत भाजपसोबत गेलले एकनाथ शिंदे (Eknath shinde) मुख्यमंत्री झाले. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. यामध्ये अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचेही दोन तुकडे झाले. अजित पवार भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी खरी राष्ट्रवादी आपलीच आहे असा दावा केला आणि अनेक लोक आपल्यासोबत असल्याचा दावाही केला. आज पक्षातील अनेक आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) आहेत. येथेही एका राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले. या एकाचे दोन भाग झाल्याने आज निवडणुकीच्या रिंगणात एकेकाळी एकाच पक्षात सोबत काम करणारे नेते आणि पक्ष ऐकमेकांविरोधात उभा आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) सुरू आहेत. यामध्ये कोण कुणाच्या विरोधात असेल असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, काही ठिकाणी लढती वेगळ्या आहेत. यामध्ये शरद पवार गट आणि शिंदे यांच्या शिवसेनेत एकही लढत होताना दिसंत नाही असं सध्याचं चित्र आहे.


मोठी बातमी! कल्याणमध्ये ठाकरे बदलणार उमेदवार? माजी महापौरांचा अर्ज दाखल

शिंदे-ठाकरे लढती

राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. यामध्ये राज्यात 15 लोकसभा मतदारसंघात भाजपची लढत थेट काँग्रेससोबत होत आहे. तर शिवसेना (उबाठा) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत 13 जागांवर संघर्ष होत आहे. यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेस आणि अजित पवार गट तसंच, शरद पवार गट आणि शिंदे यांच्या शिवसेनेत एकाही मतदारसंघात लढत होत नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये 21 जागा लढत आहे. तर महायुतीमधून शिंदे यांच्या वाट्याला 15 जागा आल्या आहेत.

Loksabha Election : खऱ्या शिवसेनेचे अध्यक्ष असाल तर…; अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना चॅलेज

 

राज्यातील लढती

शिंदेसेनेची सर्व शक्ती ठाकरेंविरुद्ध

शिंदेसेनेचे सुमारे 85 टक्के उमेदवार उद्धवसेनेशी लढत आहेत. ऐकेकाळी सोबत असेलेल्या शिंदेसेनेची ताकद आता ठाकरेंविरुद्ध लढण्यात खर्ची पडत आहे. ज्या राष्ट्रवादीविरुद्ध शिंदेसेनेने फुटीआधी रान उठविले होते, त्याविरुद्ध एकही उमेदवार मैदानात नाही.

किती ठिकाणी भाजप-काँग्रेस लढत?

भाजप काँग्रेसविरुद्ध लढत असलेल्या 15 जागांपैकी सहा जागा या विदर्भातील आहेत. विदर्भात एकूण 10 जागा आहेत. त्याखालोखाल भाजप मराठवाड्यात तीन, तर पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत दोन ठिकाणी काँग्रेसशी लढणार आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेकडील पालघर आता भाजपकडे

राज्यातील लोकसभेच्या तीन टप्प्यांचे मतदान शिल्लक आहे. तीन टप्प्यांत 35 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये मतदान होणार आहे.
अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना भाजपने पालघरसाठी उमेदवार जाहीर केला. डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना भाजपने तिकीट दिले आहे. हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे जातो की भाजपकडे याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी भारती कामडी यांना उमेदवारी दिलेली आहे.


विरोधातील लढती


शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना (शिंदे) –

13 मतदारसंघ -मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, ठाणे, कल्याण, हातकणंगले,
मावळ, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली

उद्धवसेना विरुद्ध भाजप
-5 मतदारसंघ – मुंबई उत्तर पूर्व, पालघर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव
उद्धवसेना विरुद्ध अजित पवार गट – 2 मतदारसंघ – उस्मानाबाद, रायगड
उद्धवसेना विरुद्ध रासप – 1 मतदारसंघ – परभणी

शरद पवार गट विरुद्ध भाजप– 8 मतदारसंघ –
भिवंडी, सातारा, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, वर्धा, बीड

शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट
-2 मतदारसंघ – बारामती, शिरूर

शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेना –0

काँग्रेस विरुद्ध भाजप – 15 मतदारसंघ – मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, सोलापूर, पुणे, नंदुरबार, धुळे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, जालना

काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना – 2 मतदारसंघ – कोल्हापूर, रामटेक
काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट –00

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज