Download App

Lok Sabha Election साठी ओवेसींविरुद्ध कोट्यवधींची मालकीन मैदानात; माधवी लता हैदराबादचा गड भेदणार?

Lok Sabha Election हैदराबाद ज्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या ओवेसींविरोधात भाजपने माधवी लता या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Election ) संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने हैदराबाद ज्यांचा बालेकिल्ला मानला जातो. ते सध्याचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) यांच्याविरोधात विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा असलेल्या माधवी लता ( Madhavi Latha ) या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देशभरात या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने तोडली सातारा अन् शिरुरची रसद : पवारांच्या शिलेदारांची मुंबईतून कोंडी

याच दरम्यान एकीकडे आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्याचबरोबर समाजकार्यातून हिंदूंसह मुस्लिम मतदारांना आकर्षित करणाऱ्या माधवी लता यांच्या निवडणूक अर्ज दरम्यान त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचं ही समोर आलयं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये चर्चेत असलेल्या माधवी लता त्यांच्या संपत्तीमुळे देखील चर्चेत आल्यात. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या माधवीला तया तेलंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. तर दुसरीकडे लता यांच्या तुलनेत त्यांचे विरोधी उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांची संपत्ती मात्र अत्यंत कमी असल्याचे समोर आलंय.

तीनवेळा उमेदवारी दिली पण गद्दारी केली, पृथ्वीराज चव्हाणांची उदयनराजेंवर नाव न घेता टीका

माधवी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाची मिळून तब्बल 221.37 कोटींची संपत्ती आहे. माधवी आणि यांचे पती कोम्पेला विश्वनाथ हे दोघेही व्यावसायिक आहेत. त्यांना तीन अपत्य आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे 165.46 कोटींची जंगम तसेच 55.91 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यातील एकट्या माधवी जातात यांच्याकडे 31.31 कोटींची जंगम आणि 6.32 कोटींची स्थावर मालमत्ता तसेच 3.78 कोटींचे सोन्याचे दागिने 25.20 कोटींची शेअर बाजारात गुंतवणूक, विरिंची लिमिटेडमध्ये 7.80 कोटींची गुंतवणूक असून माधवी यांचे पती या हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचे पती कोम्पेला विश्वनाथ यांच्याकडे 88.31 कोटींची जंगम मालमत्ता असून त्यात विरिंची लिमिटेडमधील 52.36 कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे.

मोदींनी साधलं साखर पट्ट्याचं टायमिंग… अजितदादा ते विखे पाटलांना फायदेशीर ठरणारा निर्णय

तर माधवी लता आणि त्यांच्या पती यांच्यासह मुलं देखील कोट्याधीश आहेत. तीन मुलं मिळून त्यांच्याकडे 45 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तसेच लता यांच्यासह कुटुंबाकडे कोट्यावधींच कर्ज देखील आहे. ज्यामध्ये माधवी यांच्यावर 90 लाखांचं तर त्यांचे पती यांच्यावर 26.13 कोटी आहे. तसेच 2021 22 च्या तुलनेत 22 23 या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील घट झालेली आहे.

तर मला लाज वाटली असती… भरसभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंना टोला

तर लता यांचे विरोधी उमेदवार ओवेसी यांच्या संपत्ती बद्दल सांगायचं झालं तर ओवेसी यांच्याकडे एकूण 19 कोटींची संपत्ती आहे. ज्यामध्ये दोन पॉईंट ऐंशी कोटींची जंगम आणि 16.1 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. तर ओवेसी यांच्या पत्नीकडे जवळपास 16 लाखांची जंगम आणि पाच कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तसेच ओवेसी यांनी प्रतिज्ञा पत्रामध्ये आपल्यावर सात कोटींचं कर्ज असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर ओवेसींनी आणखी एक खुलासा केलाय तो म्हणजे त्यांच्याकडे एक एनपी बोर .22 पिस्तुल आणि एनपी बोर 30-60 रायफल देखील आहे.

मोदींच्या आरोपाचा Fact Check : खरंच इंदिरा गांधींच्या संपत्तीसाठी राजीव यांनी ‘वारसा कर’ रद्द केला?

त्यामुळे आता एक सामाजिक कार्यकर्त्या, हिंदू नेत्या तसेच झोपडपट्टी आणि मुस्लिम भागांमध्ये गरीब आणि महिलांची मदत करणाऱ्या म्हणून ओळख असणाऱ्या प्रखर व्यक्तिमत्त्वाच्या माधवी लता. ज्यांची संपत्ती देखील प्रचंड मोठी असल्याचं दिसतंय मात्र त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या असलेला हैदराबाद मतदारसंघ ज्यांचा गड आहे त्या एमआयएम आणि पर्यायाने ओवेसी यांचे मोठं आव्हान उभं आहे. तसेच ही लढत हिंदू-मुस्लिम अशी जरी असली तरी भाजपसाठी ती दक्षिणेत आपला जम बसवण्यासाठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणूनच मोदी यांनी स्वतः सोशल मिडीयावर त्या भाजपच्या वाघिण असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे भाजपची ही वाघिण ओवेसींचा गढ भेदणार का? हे निवडणुकांच्या निकालानंतरच समोर येईल.

follow us