Download App

स्वारगेट बलात्कार प्रकरण भोवले ! पुण्याच्या विभाग नियंत्रकांची तडकाफडकी बदली

Pune Swarget Bus Depo : पुण्याचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांची बदली करण्यात आली आहे. ते आता नाशिक विभागाचे नियंत्रक असणार आहे.

  • Written By: Last Updated:

Pune Swarget Bus Depo woman Crime st controller transfer: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये (Pune Swarget Bus depo) बंद शिवनेरी बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता. याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला शिरुर तालुक्यातून अटक झाली होती. या बसस्थानकामध्ये महिलांसाठी सुरक्षा नसल्याने एसटीचा (ST) कारभार चव्हाट्यावर आला होता. या प्रकरणी एसटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच अर्थसंकल्पयीन अधिवेशनातही या प्रकरणाची पडसाद उमटले होते. त्यानंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे.

राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मुंबईला प्रथमच मिळाला अध्यक्ष; अमित ठाकरेंसह ‘या’ नेत्यांवर जबाबदारी

पुण्याचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांची बदली करण्यात आली आहे. ते आता नाशिक विभागाचे नियंत्रक असणार आहे. तर नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे. तर पुणे विभागाचे यंत्र अभियंता पंकज ढावरे यांची अकोल्याला बदली झाली आहे. त्यांच्या जागी दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील अधीक्षक स्मिता कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलीय. पुणे विभागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी गिरीश यादव यांची मुंबईला त्याच पदावर बदली झालीय. पुण्याचे सुरक्षा निरीक्षक शंकर लादे यांच्याकडे गिरीश यादव यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर प्रादेशिक व्यवस्थापक अनघा शैलेश बारटक्के यांची बदली थेट नागपूरला करण्यात आली. तर नागपूरमधील श्रीकांत मधुकरराव गभणे यांची पुण्यात बदली झाली आहे.

“कितीही काळ्या बाहुल्या बांधा माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, देवाभाऊ…”, जयकुमार गोरेंचा इशारा कुणाला?


कनिष्ठ अधिकाऱ्यांवर यापूर्वीच कारवाईचा दणका

अत्याचार प्रकरणानंतर एसटी प्रशासनाने काही कनिष्ठ अधिकाऱ्यांवर लगेच कारवाईचा बडगा उगारला होता. घटनेनंतर आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानकप्रमुख मोहिनी ढेरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रकसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरती देखील बदलीची कारवाई केली आहे.

follow us