आरोपीला मी स्वत: पाहिलं; आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणेनं सांगितला थरार, नेमकं काय झालं?

  • Written By: Published:
आरोपीला मी स्वत: पाहिलं; आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणेनं सांगितला थरार, नेमकं काय झालं?

Dattatray Gade Arrested Update : पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील (Gade ) फरार आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर गुरूवारी (ता.27) मध्यरात्री पुणे पोलिसांनी अटक केली. या आरोपीला अटक करण्यात गुणाट गावच्या ग्रामस्थांनी पोलिसांना मोठी मदत केल्याचं समोर आलं आहे.

स्वारगेट बलात्कार केस; पोलिसांनी तरुणाला ताब्यातही घेतलं, मात्र, तो आरोपी नसून त्याच्यासारखाचं

आरोपी दत्ता गाडे बलात्काराचे कृत्य केल्यापासून त्याच्या गुणाट या गावी गेल्याची माहिती समोर आली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर तो गुणाट येथील शेतात लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके तपासात गुंतली होती. डॉग स्कॉड, ड्रोनद्वारे पोलिस गाडेचा शोध घेत होते. मात्र, तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

यासाठी पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी त्याला शरण येण्याचं आवाहन देखील केलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे या तरुणाने एका व्हिडिओच्या माध्यमातून अटकेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. यावेळी त्याने पोलिसांनी तपास करताना माझ्या भावाला मारल्याच्या रागातून आम्ही आरोपीला शोधल्याचा दावा केला आहे. गणेश गव्हाणेनं सांगितलं की, “मागील 3 दिवसांपासून पोलिस आणि गुणाट गावातील लोक दत्ता गाडेचा शोधत होते.

आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. गावकरी पोलिसांना मदत करत होते. यावेळी पोलिसांकडून गावकऱ्यांची विचारपूस करत होते. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. चौकशी करताना पोलिसांनी माझ्या भावाला मारल्याच्या रागातून आरोपीला शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. यावेळी गावात ज्या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवतो तेथील चंदनवस्तीच्या परिसरात गाडे फिरत होता.

यावेळी मी स्वत: त्याला पाहिलं, यावेळी तो पळत असताना मी त्याला पकडलं आणि पोलिस अधिकाऱ्यांना कळवलं.” दरम्यान, रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी आला होता. यावेळी त्याने मला पश्चाताप होतोय, मला सरेंडर व्हायचं आहे, असं म्हणत होता. सध्या दत्ता गाडे हा पुण्यात लष्कर पोलिसांच्या ताब्यात असून त्याला दुपारी कार्टात हजर केलं जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube