“कितीही काळ्या बाहुल्या बांधा माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, देवाभाऊ…”, जयकुमार गोरेंचा इशारा कुणाला?

Jaykumar Gore : अश्लील फोटो प्रकरणी अडचणीत आलेले मंत्री जयकुमार गोरे पु्न्हा चर्चेत आले आहेत. सोलापूर येथील एका कार्यक्रमात मंत्री गोरे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पूजा करतात आणि काळ्या बाहुल्या बांधल्या आहेत. मात्र जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी विरोधकांनी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur News) माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजप शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात गोरे बोलत होते. जयकुमार गोरेंवर (Jaykumar Gore) आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना नुकतेच पकडण्यात आले. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावरील आरोपांना या कार्यक्रमातून जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्री जयकुमार गोरेंचे कारनामे चव्हाट्यावर आणले, पत्रकार तुषार खरात यांना अटक
गोरे म्हणाले, कुणाचं वाईट करुन कधीच कुणाचं चांगलं होत नाही. वाईट करणाऱ्याचं तर कधीच चांगलं होत नाही. मी कधीच कुणाच्या नादी लागत नाही. माझ्याही नादी कुणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधीच हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय तेव्हा थोडी वाट पाहा. मी आज जास्त काही बोलणार नाही. सगळंच माझ्याकडं आहे. जे काही करायचंय ते माझ्याच खात्याकडे आहे अशा सूचक शब्दांत मंत्री गोरे यांनी विरोधकांना इशारा दिला.
देवाभाऊ माझ्या पाठीशी
राज्यातील सर्वात दु्ष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठा जन्माला आलाय. माझ्या पाठीमागे देवाभाऊ आहे. माण खटाव तालुका दुष्काळ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या 32 दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
मोठी बातमी! मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक
माझं कुणीच वाकडं करु शकत नाही
अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा बांधतं. काळ्या बाहुल्या रोवतंय. एकही निवडणूक अशी गेली नाही की माझ्यावर केस झाली नाही. आम्हाला आता सवय झाली आहे. पण मी कधीच थांबलो नाही. कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत जयकुमार गोरेचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.