Letsupp Special : लोकसभेला भाजप बॅकफूटवर का ?

  • Written By: Published:
Letsupp Special : लोकसभेला भाजप बॅकफूटवर का ?


प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला (Mahavikas Agadi) ३६ जागा मिळतील असा अंदाज सी वोटर सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापालिका यांच्या निवडणुका पुढे जातं आहेत. यात काही प्रकरण न्यायालयात असली तरी ज्या पद्धतीने दिरंगाई होतेय. त्यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.  गुप्तवार्ता विभागाच्या रिपोर्ट्समध्येही नवी मुंबई , ठाणे या महापालिका वगळता राज्यातल्या २५ महापालिकांमध्ये शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (Nationalist Congress) आणि काँग्रेसचा (Congress) जोर अधिक आहे. एव्हाना नागपूरसारखी महापालिका अंदाज देखील काँग्रेसच्या बाजूने वर्तवला जातोय, अशाच पद्धतीची स्थिती सी वोटर संस्थेने पुढे आणली आहे. 

राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नदेड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर येथील महापालिका निवडणूक होणार आहेत. यात बहुतांश महानगरपालिकेत काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मतांची एकूण टक्केवारी जवळपास ५० टक्क्यांची पुढे आहे. त्यात शिवसेना मिळालेली सहानुभूतीची लाट कायम आहे. 

ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं वलय आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्यावर मतदार यांचा असलेला विश्वास यामुळे या दोन महापालिका १०० टक्के भाजप-शिंदे गटाच्या बाजूने दिसतायत.

एकूणच पालिका असलेल्या जिल्ह्यात अथवा प्रभाव असलेल्या क्षेत्रामध्ये लोकसभेचे असलेले मतदारसंघ किती याकडे लक्ष देऊ. यात मुंबईत ६ मतदारसंघ, ठाणे तीन, नाशिक दोन, पुणे चार, नागपूर दोन , सोलापूर दोन, कोल्हापूर दोन, परभणी, नांदेड असे प्रत्येकी एक २४ म्हणजेच जवळपास निम्मे मतदारसंघ शहरी भागात अथवा शहराशी जोडले आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला फरक हा ५० हजार ते १ लाख २० हजार एवढा आहे. पण ही मत भाजपची नाहीत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणारी मुस्लिम दलित मत वंचित बहुजन आघाडीकडे गेली होती. जर आता निवडणुका झाल्यास तर भाजपापासून शिवसेना वेगळा झाला आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यांच्या मतात शिवसेनेचा मतदान देखील आहे. हे मतदान भाजप ६०- ४० सेना इतक्या कमी रेशोमध्ये गृहित धरले तरीही ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात जोडले तर महाआघाडीची तफावत पूर्ण भरून निघते. 

महागाई, बेरोजगारी त्यात झालेले सत्तांतर, खोके सरकारचे आरोप, राजकारणाचे किळसवाणा स्वरूप मतदारांना नकोसे झाले आहे . याचा परिणाम या मतदानावर नक्की जाणवणार आहे.

 नागरी भागात म्हणजे महापालिका आणि नगरपालिका हा भाजप मतदार मनाला जातो. यात शिवसेनेचा वाटा देखील आहे. हीच शिवसेना दूर झाली याचा परिणाम भाजपला शहरी भागात मोठा फटका बसणार आहे.

त्यात उद्धव ठाकरे भाजपशी पंगा घेत असल्याने दलित आणि मुस्लिम मतदार यांना उद्धव ठाकरे हिरो वाटू लागले आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात काँग्रेस, राष्ट्रवादीचं मतदार टिकून आहे. त्याला सेनेची जोड मिळाली आहे. हे पाहता एकूण लोकसभा मतदारसंघात मतदानाची ढोबळ आकडेवारी ही ५० टाक्यांच्या पुढे जाते. त्याचमुळे भाजपसाठी हे धोक्याची घंटा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube