Download App

अखेर प्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज अपयशी; नैराश्यातून केला होता आत्महत्येचा प्रयत्न

American Singer : चित्रपटसृष्टीतील लोक असो की कलाविश्वातील लोक. त्यांनी निराशाचे शिकार होऊन आत्महत्या करत असल्याचं अनेकदा समोर येत. हे भारताताच नाही तर जगभारातील चित्र आहे. असं अनेकदा पाहायला मिळत. असंच एका प्रसिद्ध अमेरिकन गायिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. ‘कोको ली’ असं तिच नाव असून ती अमेरिकन गायक आणि गीतकार आहे. ( American Singer Coco lee dead after attempt suicide before some days)

Threads App : तब्बल 11 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मार्क झुकरबर्गचं पहिलं ट्विट; मस्कला केले ट्रोल

कोको ली यांची बहिण कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. कोको ली या 48 वर्षांच्या होत्या. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या कोमामध्ये गेल्या होत्या. मात्र अखेर त्यांची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी दादा बनले ढाल…

कोको ली यांच्या या पोस्टमध्ये लिहिले की, कोको ली या गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होत्या. त्यासाठी त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. त्यांनी देखील यातून बाहेर पडण्यासाठी खुप प्रयत्न केला होता. मात्र 2 जुलैला त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असता त्यांना तातडिने रूग्णालायात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचण्यासाठी खुप प्रयत्न केले मात्र त्यांचा मृत्यू झाला.

NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी दादा बनले ढाल…

कोको ली या संगात क्षेत्रामध्ये 30 वर्षांपासून काम करत होत्या. त्यांनी ए लव्ह बिफोर टाईम या ऑस्कर नॉमिनेशन असलेल्या गाण्यावर परफॉर्मन्स केला होता. त्यांचा जन्म हॉंगकॉंग मध्ये झाला होता. मात्र त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्यांच्या आई त्या आणि त्यांच्या बहिणीसह अमेरिकनेमध्ये स्थायिक झाल्या होत्या.

Tags

follow us