‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम; आठ दिवसांत 123.87 कोटींची कमाई

विशेष भट्ट यांच्या निर्मितीतील या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तिकीट खिडकीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 22T125248.342

‘Awarapan 2’ delivers a strong performance at the box office : इमरान हाश्मीचा बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष भट्ट यांच्या निर्मितीतील या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तिकीट खिडकीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने भारतात 117.66 कोटी रुपयांची निव्वळ कमाई नोंदवली असून जागतिक स्तरावर 169.49 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आठव्या दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी चित्रपटाने आणखी 6.21 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील निव्वळ एकूण कमाई 123.87 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चित्रपटाच्या कमाईचा आलेख पाहिला तर 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन 2’ने पहिल्याच दिवशी 23.40 कोटी रुपयांची दमदार कमाई केली. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा लाभ घेत 15 ऑगस्ट रोजी 34.09 कोटी रुपयांचा विक्रमी गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी 26.82 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच शंभरीकडे वेगाने वाटचाल सुरू केली. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी 10.06 कोटी, 18 ऑगस्ट रोजी 10.26 कोटी, 19 ऑगस्ट रोजी 7 कोटी आणि 20 ऑगस्ट रोजी 6.03 कोटी रुपयांची कमाई झाली. आठव्या दिवशीही चित्रपटाने 6.21 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवरील मजबूत पकड कायम ठेवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय; निवृत्त पोलीस श्वानांना दत्तक न देता पोलिसांसोबतच ठेवणार

या दमदार कामगिरीमुळे ‘आवारापन 2’ हा 2026 मधील सर्वाधिक पहिल्या आठवड्यात कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील बाजारपेठांमध्येही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याची जागतिक कामगिरी सातत्याने मजबूत होत आहे. विशेष म्हणजे, पहिल्या आठवड्यानंतरही चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झालेली नसल्याने प्रेक्षकांचा उत्साह आणि चित्रपटावरील प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.

या यशामागे इमरान हाश्मीने साकारलेली ‘शिवम पंडित’ ही लोकप्रिय व्यक्तिरेखा मोठा घटक ठरत आहे. ‘आवारापन’च्या चाहत्यांनी या सिक्वेलचे उत्साहाने स्वागत केले असून इमरानच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. भावनिक कथानक, दमदार संवाद, संगीत आणि प्रभावी सादरीकरण यामुळे चित्रपटाला सर्व स्तरांतील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

नितीन कक्कर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा आणि पटकथा बिलाल सिद्दीकी आणि विशेष भट्ट यांनी लिहिली आहे. चित्रपटात इमरान हाश्मीसोबत दिशा पटानी, शबाना आझमी, पूरण गब्बी, सुविंदर विकी आणि अनिरुद्ध रावल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली असून दीपेश शाह आणि सुनमन सूद हे सहनिर्माते आहेत. पेन मरुधरकडून देशभरात वितरित करण्यात आलेला ‘आवारापन 2’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत असून, येत्या काळात हा चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

follow us