Drishyam: The Conclusion : बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; दोन दिवसांत 179 कोटींचा गल्ला

Drishyam: The Conclusion: ‘दृश्यम: द कन्क्लूजन’चे जगभरातील कलेक्शनमध्ये शुक्रवारी 93 कोटी रुपये, तर शनिवारी 86 कोटी रुपयांची कमाई केलीय.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Drishyam The Conclusion

Drishyam: The Conclusion : अजय देवगण (Ajay Devgan)आणि जयदीप अहलावत यांच्या ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Drishyam: The Conclusion) धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दोन दिवसांत जगभरात तब्बल 179 कोटींची कमाई केली आहे. परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून, आता रविवारच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मातृ नवमीच्या संध्याकाळी चंद्राचे कर्क राशीत संक्रमण, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य

‘दृश्यम: द कन्क्लूजन’चे जगभरातील कलेक्शनमध्ये शुक्रवारी 93 कोटी रुपये, तर शनिवारी 86 कोटी रुपयांची कमाई केलीय. थरारक कथा, दमदार अभिनय आणि उत्कंठावर्धक क्लायमॅक्समुळे ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


इंग्रजी शिक्षणाच्या भवितव्यावर पुण्यात जागतिक मंथन; 7 ऑक्टोबरपासून ‘ELTAI’ आंतरराष्ट्रीय परिषद

अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘दृश्यम: द कन्क्लूजन’ हा या लोकप्रिय फ्रँचायझीतील महत्त्वाचा अध्याय असून, सध्या हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

follow us