“बनवा बनवी” नाटकातून प्रभात थिएटर्सचा अनोखा प्रयोग! सात इन्फल्यूएन्सर्स पहिल्यांदाच झळकणार रंगभूमीवर

प्रभात थिएटर्सची दुसरी निर्मिती असलेल्या या व्यावसायिक नाटकाचे नाव "बनवा बनवी" असून नाटकाच्या नावाला देखील एक कल्ट व्हॅल्यू आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (16)

Prabhat Theatres’ unique experiment with the play “Banwa Banvi” : मराठी रंगभूमीवर सध्या खूप नवीन नवीन प्रयोग सुरु आहे. त्यातच एका नवीन प्रयोगाची भर त्यात पडणार आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी इन्फल्यूएन्सर गँग आता रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी ह्या गँगच्या “बनवा बनवी” या नवीन नाटकाचा मुहूर्त पार पडला.

“लागली पैज” नंतर प्रभात थिएटर्सची दुसरी निर्मिती असलेल्या या व्यावसायिक नाटकाचे नाव “बनवा बनवी” असून नाटकाच्या नावाला देखील एक कल्ट व्हॅल्यू आहे. श्रीमती ज्योती प्रमोद कठापूरकर आणि श्री.निखिल एकनाथ करंडे हे ह्या नाटकाचे निर्माते आहेत तर सौं. प्रियंका ​हेमंत जोगी या नाटकाच्या सह निर्मात्या असून हर्षद प्रमोद कठापूरकर हे या नाटकाचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

“बनवा बनवी” नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर खांडेकर यांचे असून शंतनू रांगणेकर, ऋषभ मोरे, सुमित चव्हाण, ओंकार कदम, सोनाली गुरव,सिद्धी पोतदार आणि सुधाकर सोनावणे ही सात जणांची गँग या नाटकात धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाली आहे. नाटकाचे नेपथ्य डॉ. सुमित पाटील करणार असून, चारूलता देशपांडे नाटकाच्या वेशभूषेची सांभाळणार आहेत. हे सगळे अतरंगी कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एकत्र आले आहेत. आम्ही फक्त 2 मिनिटाचे कलाकार नसून पूर्ण वेळ नाटक करण्याची क्षमता आमच्यातदेखील आहे आणि ते सिद्ध करण्यासाठीच आम्ही सगळे जण हे नाटक करत आहोत अशी भावना शंतनू रांगणेकर ह्याने व्यक्त केली.

या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक समीर खांडेकर म्हणाले की मी स्वतः मूळ नाटकवालाच आहे आणि त्यात माझं स्वतःच आसोवा नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्यामुळे नाटकाबरोबर इन्फल्यूएन्सर गँगशी माझं कायम जवळचं नातं राहिलं आहे. त्यांच्यातल्या टॅलेंटला चॅनलाइज करण्यासाठी आणि ह्यांच्यात प्रत्येकात असलेल्या नाटकाचं पॅशन बघून मला हे नाटक लिहावंस वाटलं. शेखर दाते नाटकाचे सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. आता लवकरच हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us