‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी सुरुवात, 2500 महिलांनी केलं आदेश बांदेकरांच औक्षण
Home Minister : ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर यांचे प्रेक्षकांशी असलेले नातं नेहमीच खास राहिल आहे. गेली २० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर
Home Minister : ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर यांचे प्रेक्षकांशी असलेले नातं नेहमीच खास राहिल आहे. गेली २० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कार्यक्रमाने अनेक टप्पे गाठले आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर प्रवास करत ‘होम मिनिस्टर’ने असंख्य वहिनींच्या घरापर्यंत पोहोचत त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण केले. आता नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमाने आणखी एक ऐतिहासिक क्षण आपल्या नावावर केला आहे.
२३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूल येथे २,५०० हून अधिक महिलांनी एकत्र येत आदेश बांदेकर यांचं पारंपरिक पद्धतीने औक्षण केलं. एकाच वेळी, एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी एकत्रितपणे औक्षण केल्यामुळे या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये विश्वविक्रम म्हणून नोंद झाली.
औक्षण ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा आहे. ‘होम मिनिस्टर’च्या या उपक्रमातून हीच परंपरा मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरी करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ने आपल्या प्रवासात अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशभर प्रवास करत या कार्यक्रमाने असंख्य कुटुंबांशी जोडलेले नाते आता नव्या पर्वात आणखी एका विक्रमामुळे हे अधिक दृढ झाले आहे.
या विश्वविक्रमाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले , “होम मिनिस्टरच्या प्रवासात महाराष्ट्रातील असंख्य वहिनींनी मला आणि या कार्यक्रमाला खूप प्रेम दिलं आहे. त्यांच्या घरात जाऊन, त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांच्या आयुष्यातले अनेक सुंदर क्षण अनुभवण्याची संधी मला मिळाली. आज २,५०० हून अधिक महिलांनी एकत्र येऊन माझं औक्षण केलं, हा माझ्यासाठी केवळ विश्वविक्रम नाही, तर या सगळ्या वहिनींनी दिलेल्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा क्षण आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्र येऊन आपल्या प्रथा जपताना पाहणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा अनुभव होता. ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची सुरुवात यापेक्षा सुंदर आणि संस्मरणीय कशी असू शकते? या विश्वविक्रमामागे सहभागी झालेल्या प्रत्येक वहिनीचे आणि झी मराठीच्या संपूर्ण टीमचे योगदान आहे.”
‘गोंधळ’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा महागोंधळ
नव्या पर्वाच्या पहिल्याच टप्प्यात रचलेला हा विश्वविक्रम ‘होम मिनिस्टर’च्या दीर्घ आणि यशस्वी प्रवासातील आणखी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘होम मिनिस्टर’ ३१ ऑगस्टपासून सोम – शनि संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.