चंद्राबाबू नायडूंच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू

Clipboard   December 29, 2022 8_47 AM

नेल्लोर : आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कुंदाकुरू येथे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेवेळी चेंगराचेंगरी झाली आहे, यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत अनेक लोक जखमीही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सभेवेळी गोंधळ कसा झाला व चेंगराचेंगरी कशी झाली? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. या घटनेवर चंद्राबाबू नायडू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

चेंगराचेंगरीची घटना झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी सभा अर्ध्यावर सोडून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालय गाठलं. नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. जखमींच्या उपचाराचा खर्चही ते करणार आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रबाबू नायडू यांच्या कंदुकुर येथील रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हणामारी झाली. त्यावेळी तिथे चंगराचेंगरी झाली. यामध्ये सात टीडीपी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Tags

follow us