सुकन्या समृद्धी योजना: दरमहा 2,000 आणि 5,000 गुंतवणुकीनंतर किती पैसे मिळणार ?

Sukanya Samriddhi Yojana-सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹2,000, ₹5,000 किंवा ₹12,500 जमा केल्यास 21 वर्षांत किती पैसे मिळतील? व्याजदर, नियम, कर सवलती आणि परताव्याचा संपूर्ण हिशोब जाणून घ्या.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Smrudhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी सरकारची एक योजना आहे. त्या योजनेचा नाव सुकन्या समृद्धी योजना. या योजनेत सध्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी 8.2% वार्षिक व्याजदर लागू आहे. दरमहा 2 हजार, 5 हजार किंवा 12 हजार 500 गुंतवणूक केल्यास भविष्यात किती मोठा निधी जमा होऊ शकतो, जाणून घेऊया.

दरमहा किती गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळतील?
सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षे पैसे जमा करावे लागतात. तर खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी खाते मॅच्युअर होते. दिलेल्या व्याजदरानुसार आणि दरमहा 5 तारखेपूर्वी गुंतवणूक केल्यास किती रक्कमेला किती पैसे मिळतात ते पाहुया. दोन हजार रुपये भरल्यास 15 वर्षात गुंतवणूक रक्कम 3 लाख 60 हजार होते. तर व्याज धरून ही रक्कम 7 लाख 49 हजार इतकी होती. तर 21 वर्षांनी ही रक्कम मॅच्युअर झाल्यावर 11 लाख 9 हजार रुपये रक्कम मिळू शकते. तर पाच लाख रुपये भरल्यास 9 लाख रुपये गुंतवणूक होईल. त्यावर 18 लाख 73 हजार रुपये व्याज मिळेल. तर 21 वर्षानंतर 27 लाख 73 हजार रुपये रक्कम मिळेल. तर दर महिन्याला 12 हजार 500 रुपये भरल्यास पंधरा वर्षात 22 लाख 50 हजार रुपये रक्कम होईल. तर त्यावर 46 लाख 83 हजार रुपये व्याज मिळेल. तर 21 वर्षानंतर सर्व रक्कम 69 लाख 33 हजार इतकी होईल.


15 वर्षानंतरही व्याज मिळेल

सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे खात्यात पैसे जमा करण्याची मुदत 15 वर्षे असते. मात्र 21 वर्षांनी मॅच्युरिटी होते. पहिली 15 वर्षे खात्यात पैसे जमा करता येतात. त्यानंतर नवीन पैसे जमा करण्याची गरज नसते. पुढील 6 वर्षे खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळत राहते. चक्रवाढ व्याजामुळे अंतिम रक्कम वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित गुंतवणूक केल्यानंतर पुढील सहा वर्षे खात्यात पैसे न भरताही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.

सुकन्या समृद्धी योजनेचे नियम काय आहेत?
सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत. मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असताना खाते उघडता येतात. खाते उघडण्यासाठी किमान 250 रुपये जमा करावे लागतात. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 250 जमा करणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1 लाख 5 हजार लाख गुंतवता येतात दरमहा पैसे भरणे बंधनकारक नाही. एकरकमी किंवा अनेक हप्त्यांत पैसे भरता येतात. एका कुटुंबात सामान्यतः दोन मुलींसाठी दोन खाती उघडता येतात. जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या बाबतीत नियमांनुसार अपवाद लागू होतात.

सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे कधी काढता येतात?
मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील काही रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, यापैकी जे आधी होईल, त्यानुसार उच्च शिक्षणासाठी खात्यातून पैसे काढता येतात. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50 टक्क्यापर्यंत पर्यंत पैसे काढता येऊ शकतात. ही रक्कम एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने काढता येते. मात्र, वर्षातून जास्तीत जास्त एकदा आणि पाच वर्षांच्या कालावधीत निकषांनुसार पैसे काढता येतात. शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक असू शकते. मुलीच्या वयाच्या 18 वर्षांनंतर विवाहासंबंधी विशिष्ट परिस्थितींमध्येही नियमानुसार खाते मुदतीपूर्वी बंद करण्याची सुविधा उपलब्ध असू शकते.

सुकन्या समृद्धी योजनेत कर सवलती मिळतात का?
सुकन्या समृद्धी योजना ही EEE म्हणजे Exempt श्रेणीतील बचत योजना आहे. म्हणजेच योजनेच्या तीन टप्प्यांवर कर सवलतीचा लाभ मिळतो. एका आर्थिक वर्षात ₹1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत मिळू शकते. ही सवलत जुन्या करप्रणालीत उपलब्ध आहे. खात्यात जमा होणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही. मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. मुलीच्या भविष्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना सुकन्या समृद्धी योजना हा सुरक्षित बचतीचा पर्याय ठरू शकतो.

follow us