मोठी बातमी, मनोज जरांगेंविरोधात ED कडे तक्रार; 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवली सरटीत उपोषण करत असून आज या उपोषणाला

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Ajay Baraskar On Manoj Jarange

Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवली सरटीत उपोषण करत असून आज या उपोषणाला 14 वा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे. 12 सप्टेंबर रोजी मुंबईच्या आंदोलनाबाबत निर्णय घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्याविरुद्ध ईडीकडे तब्बल 1000 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच मनोज जरांगे हे खरातसारखे असून जरांगे यांची संपत्ती उघड झाल्यास मराठा समाजच त्यांना सोडणार नाही अशा इशारा देखील यावेळी बारस्करांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर म्हणाले की, 15 दिवसांपूर्वी ईडीकडे (ED) मनोज जरांगे (Manoj Jarange) व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आंदोलनाच्या नावाखाली जरांगे यांच्या जवळच्या लोकांनी प्रचंड अवैध माया जमवली आहे. पाडुंरंग तारक यांच्याकडे आधी फक्त 10 गुंठे जमीन होती. त्यांच्याकडे आता 50 एकर जमीन आहे. त्यांनी अंतरवली आणि छत्रपती संभाजीनगर येथे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या आहेत असा आरोप माध्यमांशी बोलताना बारस्कर यांनी केला आहे.

भुईकोटसाठी खरे प्रयत्न विखे पाटील यांचेच; लंकेनी श्रेय लाटण्याची स्टंटबाजी करू नये

मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत

पुढे बोलताना बारस्कर म्हणाले की, ज्याप्रमाणे कॅप्टन अशोक खरात यांच्या पाया पडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री जायचे आणि नंतर त्यांचे बिंग फुटून ते जेलमध्ये गेले. तसेच मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत. जरांगे हे उपोषणाचे नाटक करुन मराठा समाजाला फसवतात आणि लोकांना भुलवतात असा आरोप देखील बारस्कर यांनी केला आहे.

follow us