Gokul election result live : गोकुळ कुणाचा ? मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद पिछाडीवर

महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे मात्र मोठ्या मतांनी पिछाडीवर आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 10 19 At 1.35.28 PM

gokul-election-result-live : कोल्हापूर सहकारी दूध संघ म्हणजे गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे मात्र मोठ्या मतांनी पिछाडीवर आहे. हा महायुतीसाठी मोठा धक्का आहे. तर तिसऱ्या फेरीत सतेज पाटील गटाने मोठी मुसंडी घेतलीय.महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी असून ,त्यांचे चिन्ह कपबशी आहे. या आघाडीचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक हे करत आहेत. तर महाविकास आघाडीची राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे बंटी पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज, राजू शेट्टी हे करत आहेत. समविचारी आघाडीचे चिन्ह शिट्टी आहे.

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Oct 2026 02:34 PM (IST)

    मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद पिछाडीवर

    मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर; बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी आघाडी घेतलीय. तर महायुतीतून शोमिका महाडिक, तर समविचारी आघाडीचे अंजना रेडेकर, बयाजी शेळके, माजी आमदार राजू आवळे आघाडीवर

  • 19 Oct 2026 01:58 PM (IST)

    महिला गटातही चुरस

    महिला राखीव गटात महायुती आणि समविचारी आघाडीमध्ये चुरस आहे. महायुतीच्या शौमिका महाडिक आणि समविचारी आघाडीच्या अंजना रेडेकरांची आघाडी.

  • 19 Oct 2026 01:53 PM (IST)

    गोकुळचे माजी अध्यक्ष, माजी संचालक पिछाडीवर !

    महायुतीचे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे पिछाडीवर गेले आहेत. तर तिसऱ्या फेरीत महायुतीचे अशोक चरटी, प्रताप पाटील कावणेकर, एस. आर. पाटील, अमर पाटील, अरुण डोंगळे, कर्णसिंह गायकवाड पिछाडीवर. समविचारी आघाडीचे सर्वसाधारण गटातील शशिकांत पाटील- चुयेकर, विद्याधर गुरुबे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, राहुल देसाई, अभिजीत तायशेटे आघाडीवर.

Tags

follow us