पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला 2026-27 चा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदान

Paradise English Medium School : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ या

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Paradise English Medium School

Paradise English Medium School : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. एज्यु कनेक्टइन या शाळा शोध व्यासपीठातर्फे पुणे शहरातील २ हजार ७०१ शाळांमधून शाळेची ‘पिलर ऑफ व्हॅल्यूज’ सन्मानासाठी निवड करण्यात आली. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, नैतिक मूल्यांची जोपासना, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली आहे.

केवळ पुस्तकी ज्ञान आणि परीक्षांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर शाळेचा भर आहे.

सन २०१४ मध्ये स्थापना झाल्यापासून पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, सर्जनशीलता वाढविणे आणि त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवण करणे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्याबरोबरच त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याचे उद्दिष्ट शाळेने ठेवले आहे. संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांनी पुरस्काराबद्दल विशेष कौतुक केले.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला; न्यायालयाने दिले आदेश –

शाळेच्या स्थापनेपासून प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अलका पारिख यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा गौरव मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

follow us