एकनाथ शिंदेंनी झटका दिला; माढा, सोलापूर शिवसेना कार्यकारिणी बरखास्त

Shivsena-विशेष सखोल पुनरीक्षक (एसआयआर) मोहिमेत सर्व शिवसैनिकांनी जोमाने काम करायचे आहे.

  • Written By: Published:
Eknath Shinde

Solapur Shivsena Dissolved : कामचुकार पदाधिकाऱ्यांना जोरदार झटके देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ekanth shinde) यांनी घेतलाय. त्यामुळे पक्षांतर्गत बदल सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात अनेक तक्रार केल्या होत्या. त्या तक्रारीची पक्षाने दखल घेतली असून, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदरासंघातील शिवसेनेची कार्यकरिणी बरखास्तीचे निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने कार्यकरिणी बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना (जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख) कार्यकरिणी बरखास्त करण्यात येत आहे.

लवकरच सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमणुका हे संपर्कप्रमुखाचा अहवाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात येतील, असे पत्रात म्हटले आहे.

एसआयआरचे जोमाने काम केल्यावर पदही मिळणार !
विशेष सखोल पुनरीक्षक (एसआयआर) मोहिमेत सर्व शिवसैनिकांनी जोमाने काम करायचे आहे. तसेच या मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्या शिवसैनिकांची नोंद पक्षाकडून घेतली जाईल. त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना पद दिले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचे लक्ष्य, इनकमिंग सुरू
सोलापूर जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रेम आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले होते. त्याचमुळे आता शिवसेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगिरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

follow us