मुंबईः यंदा राज्यात पावसाने दडी मारली आहे. काही भागात जास्त पाऊस तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील धरणेही भरलेली नाही. त्यामुळे उर्वरित पाऊस न पडल्यास राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घ्यावा, अशी मागणी काही आमदार करत आहेत. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिले आहे.
कांदा खरेदी करण्याचा निर्णय कसा झाला? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं…
अजित पवार म्हणाले, मी अनेक सरकारमध्ये काम केले आहे. 2003 मध्ये सुशिलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. परंतु हा प्रयोग अजिबात यशस्वी झालेला नाही. अनेक राज्यांनीही असा प्रयोग केला आहे. परंतु धो-धो पाऊस पडत नाही. केवळ कृत्रिम पावसाचे प्रयोगाने समाधान मिळते. लोकांच्या समाधानासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो. परंतु फार काहीच परिस्थिती बदलत नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Fourth Women Policy : राज्यात महिलांचं चौथं धोरण येणार; अजित पवार यांनी केली घोषणा…
राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक गावे व वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील 350 गावे आणि 1 हजार 319 गावांना 369 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यात साडेतीनशे टँकर सुरू होते. मराठवाड्यात सध्या 57 गावे आणि 22 वाड्यांना 84 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
पुणे, सातारा जिल्ह्यात टँकर
पश्चिम महाराष्ट्रात 153 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुण्यात 40, साताऱ्यात 74 टँकर, सांगलीने 29 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापुर जिल्ह्यात दहा टँकर सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या भागात पाऊस न झाल्याने टँकरची संख्या वाढविण्याची आवश्यकता भासणार आहे.