Onion Price: फडणवीसांनी जपानमधून साधले टायमिंग; गोयल अन् मुंडे कांदा प्रश्नावरून चेकमेट

  • Written By: Published:
Onion Price: फडणवीसांनी जपानमधून साधले टायमिंग; गोयल अन् मुंडे कांदा प्रश्नावरून चेकमेट

Onion Price Rise : देशातील कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के शुल्क लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या विरोधात थेट बाजार समित्याही बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यातील राजकारणही जोरदार पेटले आहे. या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक झाले. या मुद्द्यावरून विरोधक घेरत असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांनी थेट दिल्लीत हालचाली करून केंद्रास काही निर्णय घेण्यास भाग पाडले. परंतु राज्य सरकारमध्येही याचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील वजन वापरत थेट गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. तसेच निर्णय जाहीर करण्यास आघाडी घेतली. त्यातून फडणवीस यांनी मंत्री गोयल व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चेकमेट केल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

Letsupp Special : शरद पवारांचा ‘अशोक बापूंवर’ विश्वास; अजितदादांना होमपीचवर रोखण्याची जबाबदारी

केंद्र सरकार नाफेडमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा (Onion Price) 2410 रुपये क्विंटल खरेदी करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणांचे स्वागत सत्ताधारी नेत्यांनी केले आहे. परंतु विरोधकांनी खरेदी दर व खरेदीचा साठा यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. कांद्यावरून राजकारण तापले आहे. परंतु दिवसभराची घडामोडी बघितल्यास हा निर्णय जाहीर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवाद्यांची लढाई दिसून येत आहे.



कांदा (Onion Price) खरेदी निर्णय सर्वात आधी जाहीर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील कांद्याच्या प्रश्नावर निघालेला तोडगा फडणवीस यांनी थेट जपानमधून ट्वीट करून जाहीर केला आहे. फडणवीसांनी जपानमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जोपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा फडणवीसांनी केली. ही घोषणा फडणवीसांनी सकाळी साडेदहा वाजता जाहीर केली.

‘मुख्यमंत्रीसाहेब उगीचच राजकीय पतंग करु नका’; थोरल्या पवारांच्या टीकेवर रोहित पवार आक्रमक

विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत वाणिज्यमंत्री गोयल यांना भेटण्यासाठी गेले होते. धनंजय मुंडे यांनी हा निर्णय दिल्लीत माध्यमांसमोर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जाहीर केला. तर वाणिज्यमंत्री यांनी नंतर पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे. र्णय जाहीर करण्याचा वेळ बघितल्यास फडणवीस यांनी मुंडे, गोयल यांना दोघांना मागे टाकून त्यांना चेकमेट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube