मोठी बातमी ! पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात, बारा जणांचा जागीच मृत्यू

Palghar-जिल्ह्यातील धानीवरी येथे हा अपघात झालाय. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

  • Written By: Published:
Accident Palghar

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाचा ट्रकचा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथे हा अपघात झालाय. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


कंटेनरचा डब्बा निसटला अन् होत्याचे नव्हते झाले…

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघरच्या धानीवरी येथून वऱ्हाडाचा ट्रक येत होता. त्याच्याच विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला होता. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता. साखरपुड्यासाठी वऱ्हाडी ट्रकमधून जात होते. धानीवरी येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचताच एका भरधाव वेगाने येणाऱ्याने कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यात कंटेनरचा मागील डब्बा निसटला. हा डब्बाच ट्रकवर येऊन जोरात आदळला. या धडकेत ट्रक लांब जावून पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील बारा जण गंभीर जखमी झाले.

वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये 100 हून अधिक जण असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. जखमी वऱ्हाडी मंडळींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

follow us