शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार भाजपात जातीलः संजय राऊतांचा दावा

  • Written By: Published:
शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार भाजपात जातीलः संजय राऊतांचा दावा

मुंबईः खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका केली. तर शिंदे गटातील काही जणांमध्ये असलेल्या वादावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार भाजपात स्वतःला विलीन करून घेतील व हेच त्यांचे ध्येय असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर राऊत म्हणाले, आत्मपरीक्षण कोणी करायचे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, तीच खरे शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेले आहे. जे गद्दार आहेत, जे सोडून गेलेले आहेत. त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत पाठवायचे नाही. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढत आहे. दीपक केसरकर यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले. त्यानंतर हे विधान बाहेर येत आहे.

शिंदे गटामध्ये अजून काही गट निर्माण झालेले आहेत. तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे. अब्दुल सत्तार कालच बोललेले आहेत की आमच्या गटातीलच लोक आमचा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यातून गट गटामधील वाद पुढे येत आहेत.मी तुम्हाला वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही. हा गट देखील टिकणार नाही.यामधील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःला विलीन करून घेतील.हेच त्यांचे ध्येय असल्याचा दावाही राऊत यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणावर राऊत यांनी जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते. महाराष्ट्राच्या विकासावरती बोलण्यासाठी
,जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळते. राज्याच्या विकासावर कोण बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले तर ते गल्लीतले भाषण वाटते. त्यांना संधी मिळाली. ती बेकायदेशीर पद्धतीने मिळालेली आहे. महाराष्ट्रात जर भाजपाचे १४५ मिशन होत असेल तर शिंदे गट कुठे आहे?, मग शिंदे गटातील लोक काय धुणी भांडी करायला ठेवणार का ? भारतीय जनता पार्टीच्या पायरीवर देखील यांना कोणी उभा करत नाही. ही तात्पुरती तडजोड असल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube