Chandrayaan-3 : इस्रोने आज दुपारी 2 वाजून 35 मिनीटांनी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण केलं. भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. 2019 साली चांद्रयान मोहिमेत भारताला लॅंडर आणि रोव्हरच्या सॉफ्ट लॅंडिगमध्ये अपयश आले होते. त्यानंतर आता चांद्रयान ३ चे प्रेक्षपण करण्यात आलं श्रीहरिकोटा येथून चांद्रयानचे प्रक्षेपण झालं. पण तुम्हाला ठाऊक आहे का? भारताकडून अंतराळ मोहिमेसाठी पाठवलेले प्रत्येक अंतराळ यान हे उपग्रह श्रीहरिकोटा येथूनच का प्रक्षेपित केलं जातं? याच विषयी जाणून घेऊ. (sriharikota facts why isro launch satellite from satish-dhawan space centre)
इस्रो हे श्रीहरिकोटा येथूनच भारताचे सगळे उपग्रह प्रक्षेपित करते. कारण श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशातील एक द्वीप आहे. ही जागा पूर्वे दिशेला प्रक्षेपणासाठी फायदेशीर मानले जाते.
1969 मध्ये लॉन्चिंग स्टेशन म्हणून या जागेची पहिल्यांदा निवडली गेली. रोहिणी 1A हा पहिला आॉर्बिट उपग्रह 10 ऑगस्ट 1979 रोजी प्रक्षेपित करण्यात आला. मात्र त्यात असलेल्या कमतरतेमुळे तो 19 ऑगस्ट रोजी नष्ट झाले. त्यानंतर भारताने आपले सगळेच उपग्रह हे श्रीहरिकरोटा येथून प्रक्षेपित केले.
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches #Chandrayaan-3 Moon mission from Satish Dhawan Space Centre in Sriharikota.
Chandrayaan-3 is equipped with a lander, a rover and a propulsion module. pic.twitter.com/KwqzTLglnK
— ANI (@ANI) July 14, 2023
हे ठिकाण खास का आहे?
या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. हे ठिकाण विषुववृत्ताजवळ आहे. पूर्व दिशेला जाणाऱ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. पूर्व किनाऱ्यावर असल्याने त्याचा वेग ०.४ किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे.
बहुतेक उपग्रह पूर्व दिशेला प्रक्षेपित केले जातात. या ठिकाणी फारशी लोकसंख्या नाही. इथं एकतर इस्रोचे लोक राहतात आणि स्थानिक मच्छीमारांची वस्ती आहे. याशिवाय, अन्य कोणी या ठिकाणी राहत नाही.
श्रीहरिकोटाला कसे जायचे?
हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग NH-5 वर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन 20 किमी अंतरावर आहे. सुल्लुरपेटा हे सर्वात जवळचे शहर आहे आणि हेच सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन देखील आहे.
हे ठिकाण चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 70 किमी अंतरावर आहे. इस्रोच्या परवानगीने श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्र पाहता येतं. दर बुधवारी येथे पर्यटकांना आणलं जातं.