Union Cabinet : मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, होणार चार नव्या मंत्र्यांचा समावेश

Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंत्रिमंडळात फेरबदल

Union Cabinet

Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर महाराष्ट्रातून आणि उत्तर प्रदेशातून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असं देखील बोललं जात आहे. तर आता मोदी सरकारमध्ये चार नव्या मंत्र्यांचा समावेश होणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे राज्यसभा निवडणूक. भाजपकडून उत्तर प्रदेशातील आठ राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत सध्याचे केंद्रीय मंत्री बी.एल. वर्मा (B.L. Verma) आणि हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांना आता मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. सुरु असणाऱ्या चर्चेनुसार, बी.एल.वर्मा आणि हरदीप सिंग पुरी यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या टीममध्ये चार नवीन मंत्री सामील होऊ शकतात. पुरी, वर्मा, रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे. बिट्टू (Ravneet Singh Bittu) हे रेल्वे राज्यमंत्री होते. जूनमध्ये त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी जुलैमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नाही. 2027 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी बिट्टू सरकारमधून बाहेर पडतील, अशी चर्चा होती.

जॉर्ज कुरियन (George Kurien) यांनीही राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर जूनमध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  कुरियन हे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते सरकारमधील एकमेव ख्रिश्चन मंत्री होते. त्यांनी 9 जून 2024 रोजी पदभार स्वीकारला.कुरियन यांच्यावर भाजप संघटनेत एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा होती मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत (Rajya Sabha Elections 2026) पुरी आणि वर्मा यांची नावे नाहीत. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये पशुसंवर्धन मंत्री धर्मपाल सिंह, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राधाकांत ओझा, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पाल, माजी खासदार विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, माजी खासदार प्रियंका सिंह रावत, प्रदेश सरचिटणीस रामप्रताप सिंह चौहान आणि झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांची कन्या श्रुती गंगवार यांचा समावेश आहे.

राधाकांत ओझा (Radhakant Ojha) हे प्रतापगडचे रहिवासी आणि समाजवादी पक्षाच्या (SP) सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवकांत ओझा यांचे धाकटे भाऊ आहेत. पक्षाने ओबीसी (तीन), दलित (दोन), ब्राह्मण (दोन) आणि ठाकूर (एक) समाजातील उमेदवारांना पसंती दिली आहे.

आज ‘या’ 4 राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस

राज्यघटनेच्या कलम 75 (5) नुसार, जर एखादा मंत्री संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनण्यात अपयशी ठरला, तर त्याला आपले पद सोडावे लागते. पुरी आणि वर्मा यांचा राज्यसभेतील कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना स्थान मिळण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

follow us