संजय गायकवाड पातळी सांभाळून बोला, अमोल मिटकरींचा इशारा

संजय गायकवाड पातळी सांभाळून बोला, अमोल मिटकरींचा इशारा

अकोला : राज्यामध्ये सध्या संभाजी महाराज यांचा मुद्दा गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी अमोल मिटकरी यांना उद्देशून मला छत्रपती संभाजी महाराज यांचा काही संबंध नाही, यांच्या घराण्याचा काही संबंध नाही त्यामुळं त्यांनी संभाजी राजांवर काही बोलू नये, अशी टीका संजय गायकवाड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केली आहे.

आज त्यावर आमदार मिटकरी यांनी पलटवार केलाय, ते म्हणाले की, जर कोणाचं आडनाव गायकवाड असेल तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यातील सैन्यांसोबत आपला संबंध जोडू नये. संजय गायकवाड माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मी त्यांचा आदर करतो. आम्ही शांत आहे. मला शांत राहू द्या. तुमच्यासारखी पातळी सोडून बोलण्याची परंपरा आमच्या पक्षात नाही. तर माझे हिंदुत्व हे सर्व धर्म समभावाचं आहे. संभाजी राजे स्वराज्य रक्षक होते आणि आहेत आणि स्वराज्य रक्षक राहतील, असेही सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे विदर्भातील चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते त्या ठिकाणी त्यांनी दर्ग्यावर जाऊन चादर चढवली आणि दर्शन घेतल्याने हा विषय सध्या चर्चेला आला असून एकीकडं भाजपही मुस्लिमांच्या विरोधक पार्टी म्हणून पाहिले जाते तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमांची टोपी नाकारतात. तर त्यांच्याच पक्षाचे नेते दर्ग्यावर चादर चढवत असतील तर हे हिंदुत्व आम्हालाही आवडलं. त्यामुळं आता भाजपला मुस्लिमांची मतं घ्यायची आहेत आणि चंद्रपूरची लोकसभा त्यांना पाहिजे. त्यामुळं आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांना घेऊन गेल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी अभिनंदन केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube