उद्धव ठाकरेंची आजची सभा रडायची, टोमणे मारायची, शितल म्हात्रेंनी ठाकरेंना डिवचलं
मुंबई : आज रत्नागिरीतील (Ratnagiri)खेडमध्ये उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray)जाहीर सभा होतेय. ही सभा रामदास कदम (Ramdas Kadam)यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणारंय. खेडच्या गोळीबार मैदानात सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणारंय. नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होतेय. त्यामुळं या सभेत उद्धव ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेवर शिंदे गटाकडून टीकेची झोड उठवली जातेय. त्यावर शिंदे गटाच्या (Shinde Group)नेत्या शितल म्हात्रे (Shital Mhatre)यांनी जोरदार टीका केलीय.
शितल म्हात्रे म्हणाल्या की, आता त्यांच्याकडं अपेक्षा काय करणार? त्यांना त्यांच्याकडूनच आता अपेक्षा नसणार आहेत. त्याच्यामुळं आता रडायचा कार्यक्रम असणारंय, टोमणे मारायचा कार्यक्रम असणारंय आणि आमच्यावर कसा अन्याय झाला हे सांगण्याच्या पलीकडं या यात्रांचं आणि सभांचं आयोजन त्यासाठीच केलं जातंय.
Devendra Fadnavis : देशपांडे हल्लाप्रकरणी फडणवीस बोलले; म्हणाले, पोलिसांचा तपास..
अडीच वर्ष तुमच्याकडं सत्ता होती त्यावेळी तुम्ही काय केलं ते सांगण्यासारखं तुमच्याकडं काहीच नाही त्याच्यामुळं फक्त टीका करायची आत्ताच्या सरकारबद्दल विरोधात बोलायचं, लोकांमध्ये सरकारबद्दल संभ्रम करायचा याच्यापलिकडं त्यांच्याकडं बोलण्यासारखं सांगण्यासारखं काहीच नाही.
एक लक्षात घ्या की होमटाऊनमध्ये उद्धव ठाकरे किती दिवसांनी आले आहेत, त्यांनाच विचारा. खरोखर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मी आभार मानते की, त्यांच्यामुळं उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जिल्हे गावं कळताहेत. हेच जर आधी कळालं असतं तर ही वेळ आली नसती.
ठीक आहे त्यांना आता महाराष्ट्रात सगळीकडं जाऊन माझ्यावर कसा अन्याय झालाय हे सांगण्यापलीकडं काहीच हातात नाही, त्याच्यामुळं ते तेच करणार आहेत. त्याची आम्हाला सवय झाली आहे आणि आम्ही त्यांना फार महत्त्वही देत नाही अशा प्रकारची जोरदार टीका शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय.