IND vs AFG : भारताचा दणदणीत विजय ; अफगाणिस्तानचा एका डावाने आणि 300 धावांनी पराभव

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरु असणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने शानदार खेळ करत अफगाणिस्तानचा एका डावाने

IND Vs AFG

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरु असणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने शानदार खेळ करत अफगाणिस्तानचा एका डावाने आणि 300 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या डावात 152 धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाने दिलेल्या फॉओ-ऑन मुळे अफगाणिस्तानचा दुसरा डाव 112  धावावर गारद झाला. भारताने आपला पहिला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित केला होता.

तर दुसरीकडे या सामन्यात भारतासाठी पदार्पण करणारा मानव सुथार हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या डावात 22 षटकांत 33  धावा देत सहा बळी घेतले तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतला. अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने 4 बळी घेतले तर कुलदीप यादवने तीन बळी घेत या विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताने दिला ‘फॉलो-ऑन’

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मानव सुथारने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर थांबवला. भारताने आपला पहिला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित करुन 412 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर भारताने अफगाणिस्तानला फॉलो-ऑन देण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तान दुसऱ्या डावात 112 धावावर गारद झाला. भारताने एकमेव कसोटी सामना 300 धावा आणि एका डावाने जिंकला.

सप्टेंबरपर्यंत कुठे दुष्काळ तर कुठे येणार पूर; जाणून घ्या ‘गॉडझिला एल निनो’ चा इशारा-

follow us