IND vs AFG : अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी

IND vs AFG : बीसीसीआयने 13 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन टी20 सामने

  • shakir sayyad
  • Written By: Published:
IND Vs AFG

IND vs AFG : बीसीसीआयने 13 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन टी20 सामने खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेसाठी बीसीसीआय कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर आता भारतीय संघाची घोषणा झाली असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघात स्टार खेळाडू संजू सॅमसनचा देखील पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन झाला आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे मात्र त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून राहणार असल्याची देखील माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

संजू सॅमसनचे पुनरागमन

13 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबर, दुसरा सामना 15 सप्टेंबर आणि तिसरा सामना 17 सप्टेंबर रोजी होणार असून या मालिकेसाठी संजू सॅमसनला देखील भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात खराब कामगिरी केल्याने संजूला संघातून बाहेर काढण्यात आले होते मात्र या मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर गेल्या काही मालिकेपासून खराब फॉर्मशी संघर्ष करत असणारा अभिषेक शर्माला देखील भारतीय संघात जागा देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? –

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा

follow us