IND vs AFG : वैभव सूर्यवंशीला संधी तर संजू बाहेर? दुसऱ्या टी20 साठी भारतीय संघात 3 बदल
IND vs AFG : अफगाणिस्तान आणि भारत दरम्यान सुरु असणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेती दुसरा सामना दिल्लीत होणार आहे. पहिल्या सामन्यात
IND vs AFG : अफगाणिस्तान आणि भारत दरम्यान सुरु असणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेती दुसरा सामना दिल्लीत होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत मालिकेत आघाडी घेतली आहे. तर आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघात तीन बदल ?
पहिल्या टी20 सामन्यात शानदार कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. वरुणने पहिल्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 16 धावा देत एक विकेट घेतला होता मात्र यानंतर झालेल्या दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी रवी बिश्रोईला (Ravi Bishnoi) संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात फेल ठरणारा संजू सॅमसनच्या (Sanju Samson) जागी वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) संधी मिळू शकते. वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने गेल्या काही महिन्यांत भरपूर धावा केल्या आहेत जर असं झालं तर सॅमसनच्या जागी इशान किशन यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारू शकतो.
तर दुसरीकडे नितीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे पैकी एकाला आज डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. कारण सुंदर ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता प्रदान करतो.
दुसरा T20 सामना कधी सुरू होईल?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील दुसरा टी20 सामना आज, 15 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी सायंकाळी 7.00 वाजता मैदानात उतरतील. हा सामना ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर थेट पाहता येईल, तसेच ‘फॅनकोड’ (FanCode) ॲप किंवा वेबसाइटवर त्याचे ऑनलाइन प्रसारण (स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल.