त्या दिवशी मला वाटलं होत मी निर्वस्त्र… ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य

Bollywood Culture : बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना अनेकदा अनेक प्रकारचा सामना करावा लागतो. पूर्वी करीयर नष्ट होईल या भीतीने अभिनेत्री शांत राहायच्या. (Bollywood) मात्र, काळ पूर्णपणे बदलाल आहे. अभिनेत्री पुढं येत त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आहे.
मौसमी चॅटर्जी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण त्यांनी कधीच मोठ्या पडद्यावर स्विमसूट आणि तोकडे कपडे घातले नाहीत. मोठ्या पडद्यावर तोकडे कपडे घालणं मौसमी चॅटर्जी यांना देखील कधी पटलं नाही. यावर मौसमी चॅटर्जी यांनी अनेकदा स्वतःचं मत देखील मांडलं आहे. तोकडे कपडे आवडत नसल्यामुळे मौसमी चॅटर्जी यांनी कायम साडी आणि पारंपरिक ड्रेसमध्ये शूट केलं. एवढंच नाही तर, त्यांनी कधी डीप नेक ब्लाउज देखील घालण्यास होकार दिला नाही.
‘गुड्डी’ सिनेमातून मौसमी चॅटर्जी यांना एकाच कारणामुळे काढण्यात आलं कारण त्यांनी सिनेमात स्कर्ट घालण्यास नकार दिला. मौसमी चॅटर्जी यांच्या वक्तव्यानुसार, वयाच्या 13 व्या वर्षापासून मौसमी चॅटर्जी यांनी साडी नेसण्यास सुरुवात केली. मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, ‘एकदा कॉस्ट्यूम डिझायनर मणि जे रबाडी यांनी मला सिनेमासाठी बॅकलेस ब्लाऊज आणि छोटा घागरा दिला होता.’
मौसमी चॅटर्जी यांच्या वक्तव्यानुसार, वयाच्या 13 व्या वर्षापासून मौसमी चॅटर्जी यांनी साडी नेसण्यास सुरुवात केली. मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, ‘एकदा कॉस्ट्यूम डिझायनर मणि जे रबाडी यांनी मला सिनेमासाठी बॅकलेस ब्लाऊज आणि छोटा घागरा दिला होता.’