22 दिवसांची प्रतीक्षा डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल मधील छोटूच्या कास्टिंगमागची खास गोष्ट !
Detective Dhananjay या वेब शो च्या चर्चा सर्वत्र सुरू असताना या सीरिज मधली एक खास जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
22 Days of Waiting The special story behind Chotu’s casting in Detective Dhananjay Rahasyajaa : मराठी ZEE5 वरील ” डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल” या वेब शो च्या चर्चा सर्वत्र सुरू असताना या सीरिज मधली एक खास जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. डिटेक्टिव्ह धनंजय आणि त्याचा विश्वासू साथीदार छोटू म्हणजे पुष्कराज यांची केमेस्ट्री चांगलीच रंगली असून ती बघताना प्रेक्षकांना देखील मज्जा येते. रहस्य आणि धारदार कथानकावर आधारित असलेल्या या मालिकेत आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्रीमुळे त्यांचा पत्राना एक वेगळीच रंगत येते आहे. विशेष म्हणजे छोटूच्या कास्टिंगची गोष्टही तितकीच रंजक आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्सुकता, प्रतीक्षा आणि योग्य वेळ यांचा सुंदर संगम असलेली ही मालिका न चुकवण्यासारखी आहे यात शंका नाही.
पुष्कराज कसा या भूमिकेत आला याबद्दल सांगताना आदिनाथ म्हणाला की “सुरुवातीपासूनच हा निर्णय अगदी सहज वाटत होता. कास्टिंगची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मोठा प्रश्न होता की छोटूची भूमिका कोण करणार? आणि माझ्या मनात पहिल्यांदा आलेलं नाव म्हणजे पुष्कराज. गिरीशने ज्या पद्धतीने हा पात्र लिहिल होत त्यात आम्हाला आधीपासूनच तो दिसत होता. रांगादादा आणि मला दोघांनाही वाटलं की आपल्याला पुष्कराजसारखाच कोणी हवा ! तो म्हणाला. पुढे एक गोड प्रसंग आठवत तो सांगतो मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा खरंच फॅनसारखा उत्सुक होतो. मी त्याला सामाजिकदृष्ट्या कधी भेटलो नव्हतो, पण त्याचं काम पाहिलं होतं. त्याच्याशी बोलणं झालं आहे का, हेही मला माहित नव्हतं. म्हणून मी त्याला सहज विचारलं, ‘तुला रांगादादांचा कॉल आला का?’ आणि त्याने नाही असं सांगितलं.”
मोदींच्या दहा रुपयांच्या झालमुरीमुळे जिल्ह्याचा निकाल फिरला ! झाडग्राममधील चारही जागा भाजपकडे
पुष्कराजसाठी हा अनुभव तितकाच उत्सुकता आणि संयमाने भरलेला होता यावर बोलताना तो सांगतो “मी स्वतःच डिटेक्टिव्हसारखा झालो होतो. तो हसत म्हणतो मी सतत फोन करत होतो, काही अपडेट आहे का ते विचारत होतो. रांगासरांना मी ओळखत होतो, त्यांच्या सोबत वेगवेगळ्या कामांमध्ये काम केलं होतं, पण अभिनेता म्हणून कधीच नाही. त्यामुळे मी खूप वाट पाहत होतो. २२ दिवस मला कॉलच आला नाही… मी अक्षरशः दिवस मोजत होतो.”
West Bengal Result : 4 मई ‘दीदी’ गई! बंगालमध्ये बॅनर्जींची ‘ममता’ कमी करणारे शाहंचे 4 ‘धुरंधर’
शेवटी ती प्रतीक्षा संपली एक दिवस त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की ‘धनंजय आणि छोटू’ करशील का? मी एक क्षणही न विचार करता होकार दिला. मी त्या कथा वाचल्या होत्या, आणि खरं सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं,” पुष्कराज सांगतो. कधी कधी योग्य कास्टिंग ही फक्त ऑडिशनवर अवलंबून नसून योग्य वेळ आणि थोड्या चिकाटीवर अवलंबून असते आणि या बाबतीत या सगळ्यांचा सुंदर मेळ साधून छोटू हे पात्र जिवंत झालं.