72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, हमसफर या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘लघुपट’ चा पुरस्कार
72nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
72nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची (Anushka Motion Pictures & Entertainment) प्रस्तुती असणारा हमसफर या मराठी चित्रपटाला नॉन-फीचर श्रेणीतील ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ चा पुरस्कार मिळाला आहे. तर फीचर फिल्म श्रेणीमध्ये, ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’चा पुरस्कार श्रीकांत (Srikanth) या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून यात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे.
तर नॉन-फीचर फिल्म श्रेणीमध्ये, ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ चा पुरस्कार राम-नामी (Ram-Nami) (हिंदी) या चित्रपटाला मिळाला. सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म’चा पुरस्कार पिप्लांत्री: अ टेल ऑफ इको-फेमिनिझम (Piplantri: A Tale of Eco-Feminism) (हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी) या चित्रपटाला मिळाला.
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे. या लघुपटात मुख्य भूमिका अभिनेते विजय पाटकर यांची आहे. तर अभिजित दळवी यांनी लघुपट दिग्दर्शित केलाय. तर प्रणित मेढे आणि पुष्कर तांबोळी कार्यकारी निर्माते आहेत.
या लघुपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही संवाद नाही. संपूर्ण कथा पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून पुढे सरकते. ही कथा एका आजोबांची (विजय पाटकर) आणि त्यांच्या जुन्या रेडिओची आहे. हा रेडिओ केवळ एक वस्तू नसून, त्यांच्यासाठी एक हक्काचा ‘हमसफर’ (सोबती) बनला आहे. वस्तूंच्या माध्यमातून जुन्या आठवणी कशा जिवंत राहतात आणि माणसाचे वस्तूंशी किती घट्ट भावनिक नाते जडू शकते, याचे उत्कृष्ट चित्रण यात केले आहे.
यापूर्वीही या लघुपटाला विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. या लघुपटाला ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2025’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ (Best Short Film) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) ‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत या फिल्मचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले आणि तिथे समीक्षकांनी याचे भरभरून कौतुक केले. आणि आता राष्ट्रीय पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम असेल, पण रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम