Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकलेची ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावरील फाडफाड इंग्रजी पाहिलात का? Video

Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकलेची ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावरील फाडफाड इंग्रजी पाहिलात का? Video

Khupte Tithe Gupte : ‘झी मराठी’वरील बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte ) या कार्यक्रमाचा सध्या तिसरा सीझन जोडणे चर्चेत येत आहे. (Entertainment) राजकीय नेते आणि कलाकारांच्या हटक्या मुलाखतीमुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगदार होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar ) हजेरी लावली होती. आता पुढील भागामध्ये बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेला अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) एन्ट्री करणार असल्याचे (Social media) बघायला मिळत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


‘खुपते तिथे गुप्ते’च्या या नवा भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या प्रोमोत अभिजीत बिचुकले स्वतःच्या इंग्रजी भाषेचे चांगलंच कौतुक करत असताना बघायला मिळत आहे. बिचुकले म्हणतात की, “मी इंग्रजी असं बोलतो ना की, मी बोललेले शब्द डिक्शनरीमध्ये कुठेही सापडणार नाही.” त्यानंतर ते काही वाक्य इंग्रजीमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. हे ऐकून अवधूत गुप्ते देखील म्हणतो की, “एवढं फाडफाड इंग्रजी बोलायला लागलात की, मला आता कौतुकाने काय करावं हेच कळतं नाही.

यावेळी या दोघांमधील सवांद बघायला मिळत आहे. याचा अर्थ ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या भागामध्ये अभिजीत बिचुकले यांचं जबरदस्त इंग्रजी ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. तसेच अवधूत गुप्तेच्या धारदार सवालाना उत्तरं कशाप्रकारे बिचुकले देत आहेत, हे देखील बघणं उत्सुकतेच राहणार आहे.

KBC 15 शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही ७ कोटी; या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

दरम्यान, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात याअगोदर जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे देखील सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube