Ankita Lokhande Father Passed Away : टिव्ही अभिनेत्री अंकीता लोखंडेला पितृशोक झाला आहे. तिचे वडील श्रीकांत लोखंडे यांचं निधन झालं आहे. मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या इंटरफेस अपार्टमेंन्टमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्याा सकाळी 11 वाजता ओशिवारामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Actress Ankita Lokhande Father Shrikant Lokhande Passed Away )
आता फेक न्यूज पसरवल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास! नव्या विधेयकात कठोर तरतूद
अंकीताचं तिच्या वडीलांशी अत्यंत घनिष्ठ नातं होतं. ती नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना आरोग्याच्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा अंकिताने त्यांचे हॉस्पिटलमध्ये असतानाचे आणि डिस्चार्ज झाल्याचे फोटो पोस्ट केले होते.
‘हरी तुला मरू देणार नाही’.. हरी नरकेंच्या आठवणीने भुजबळांना अश्रू अनावर
वडिलांच्या निधनाने अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तिचे कुटुंबीय सध्या दुःखाच्या छायेत आहेत. अंकीताचे वडील श्रीकांत लोखंडे हे बॅंकेत काम करत होते. टीव्ही मालिकांमधून चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे 2021 मध्ये अंकिताने बिजनेसमन विक्की जैनशी विवाह केला.
दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे यांच देखील नात त्यांनी अनेकदा जाहिर केलं होत. मात्र त्यानंतर ते विभक्त झाले. तर अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या संशयीत मृत्यूच्यावेळी अंकिता पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आली होती. सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तर याच मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहचली होती.