अभिनेत्री रिमी सेनची थेट लँड रोव्हर कंपनीकडे डिमांड, मागितली 50 कोटींची भरपाई

अभिनेत्री रिमी सेनची थेट लँड रोव्हर कंपनीकडे डिमांड,  मागितली 50 कोटींची भरपाई

Rimi Sen : बॉलीवूडची अभिनेत्री रिमी सेनने (Rimi Sen) लँड रोव्हर (Land Rover) कंपनी विरोधात तब्बल 50 कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रिमीने 2020 मध्ये लँड रोव्हर कार खरेदी केली होती मात्र कंपनीने कार संबंधित दुरुस्तीपासून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप रिमी सेनने केला आहे.

माहितीनुसार, 2020 मध्ये रिमी सेनने सतीश मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 92 लाख रुपयांना ही कार खरेदी केली होती. तिने खरेदी केलेल्या कारची वॉरंटी जानेवारी 2023 पर्यंत वैध होती मात्र 2020 मध्ये कोरोनामुळे आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे कारचा वापर झाला नाही. मात्र लॉकडाऊननंतर रिमी सेनने ही कार वापरण्यास सुरुवात केली तेव्हा या कारमध्ये अनेक समस्यांना येण्यास सुरुवात झाली. यामध्ये सनरूफ, साऊंड सिस्टीम आणि रियर-एंड कॅमेरा यांच्याशी संबंधित समस्यांचा समावेश होता.

रिमी सेनने दावा केला आहे की, 25 ऑगस्ट 2022 रोजी या कारच्या रियर कॅमेरामध्ये बिघाड झाल्यामुळे कार एका खांबावर आदळली. यानंतर याची माहिती रिमीने सतीश मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडला दिली मात्र तरीही देखील यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रिमी सेनने आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, ही कार दहापेक्षा जास्त वेळा दुरुस्तीसाठी पाठवले गेले मात्र त्यानंतरही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास आणि प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा दावा रिमीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

पतंजली पुन्हा न्यायालयात, ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

50 कोटींची भरपाई देण्याची मागणी

रिमी सेनने लँड रोव्हरकडे कारचे बिघाड आणि त्याची वारंवार दुरुस्ती आणि त्यामुळे होणारा मानसिक छळ यासाठी 50 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. याचसोबत कायदेशीर खर्च भागवण्यासाठी अतिरिक्त 10 लाख रुपयांची मागणी देखील लँड रोव्हरकडे रिमी सेनने केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या