‘The Kerala Story’च्या वादावर अनुपम खेर यांची परखड प्रतिक्रिया; म्हणाले…

‘The Kerala Story’च्या वादावर अनुपम खेर यांची परखड प्रतिक्रिया; म्हणाले…

Anupam Kher On The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा ५ मे दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा मोठा वाद सध्या सुरु आहे. या सिनेमाला प्रोपगंडा सिनेमा (Cinema) असे म्हणून या सिनेमात करण्यात आलेले दावे खोटे आहेत, असे म्हणत अनेक राजकीय (Political) पक्ष आणि धार्मिक संघटनांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)


आता ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर (Anupam Kher) यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. सुदीप्तो सेन यांनी ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. धर्मांतराद्वारे काही महिलांना मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करण्यात आले असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांची कथा या सिनेमात दाखविण्यात आली आहे.

काही जण या सिनेमाचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही जण या सिनेमावर जोरदार टीका करत आहेत. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात या सिनेमाचे स्क्रीनिंग थांबवण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. या सगळ्यांवर आता अनुपम खेर यांनी त्यांचे परखड मत मांडले आहे. त्यांनी दिलेल्या एएनआयच्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाला तेच लोक विरोध करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध केला होता. हे ते चेहरे आहेत, जे अशा प्रकारच्या सिनेमांना विरोध करत आहेत आणि आपण त्यांना अनेक ठिकाणी बघू शकता. सीएएचा विरोध असो, शाहीन बागचा विरोध असो किंवा जेएनन्यूमधील विरोध असो… हे तेच चेहरे आहेत, ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध केला होता. यातून त्यांना काय साध्य करायच आहे.

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

हे आजून देखील कोणाला माहिती नाही. पण या लोकांकडे लक्ष न देणेच खूप चांगले, असे मला वाटते, अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, मी अजून हा सिनेमा बघितला नाही, पण सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारे सिनेमा बनवले जात आहेत आणि चाहत्यांचा त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. याबरोबरच ज्यांना हा सिनेमा प्रोपगंडा सिनेमा वाटतो, ते त्यांना योग्य वाटणार असा विषय सिनेमा बनवण्यासाठी मोकळे राहणार आहेत. त्यांना कोणीही रोखले नाही. आता अनुपम खेर यांचे हे बोलणे सध्या खूपच चर्चेत येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube