“मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे” : ‘शेखर टुनाइट’मध्ये वडिलांच्या आठवणींनी बॉबी देओल भावूक

Shekhar Tonight :  शेखर सुमन पुन्हा एकदा त्यांच्या मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत.

Shekhar Tonight 1

Shekhar Tonight :  शेखर सुमन पुन्हा एकदा त्यांच्या मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पहिल्या दमदार भागानंतर आता ‘शेखर टुनाइट’ चा दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी देओल चर्चेत आहेत. मात्र या भागात प्रेक्षकांना त्यांचा एक अतिशय भावुक आणि हळवा पैलू पाहायला मिळणार आहे. आपल्या वडिलांबद्दल आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगताना बॉबी भावुक झालेले दिसतात.

कार्यक्रमातील एका भावनिक क्षणी बॉबी देओल (Bobby Deol) यांनी सांगितले की, “माझ्या वडिलांवर संपूर्ण जग प्रेम करत होतं. हे मला नेहमीच माहिती होतं. पण ते आपल्यात नसताना जे दुःख आणि पोकळी निर्माण झाली, ती फक्त आमच्या कुटुंबानेच नाही तर जगभरातील चाहत्यांनीही अनुभवली. आजही मी कुठेही गेलो तरी लोक धर्मेंद्रजींची आठवण काढताना भावुक होतात. ते खूप खास व्यक्ती होते आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.” यानंतर शेखर सुमन यांनी जेव्हा त्यांना विचारलं  की, वडिलांची कोणती गोष्ट त्यांना सर्वात जास्त आठवेल, तेव्हा बॉबी पुन्हा भावुक होतात. ते म्हणाले , “एखादी एकच गोष्ट सांगणं कठीण आहे, कारण त्यांची प्रत्येक गोष्ट खास होती. त्यांचा रागसुद्धा प्रेमासारखाच वाटायचा.”

भावनिक संवादांसोबतच या भागात काही हलकेफुलके आणि मनाला भिडणारे क्षणही पाहायला मिळणार आहेत. शेखर सुमन गंमतीत बॉबींना विचारतात की, “आज तुम्ही विजय सिंह देओल म्हणून आलात, बॉबी देओल म्हणून, बाबा देओल म्हणून की इंटरनेटचा ‘लॉर्ड बॉबी’ म्हणून?” यावर बॉबी हसत उत्तर दिल , “मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे.” त्यांच्या या एका उत्तरातून वडिलांप्रती असलेलं प्रेम आणि अभिमान सुंदरपणे दिसून येतो.

तुमचं भविष्य उद्ध्वस्त केल्याने भाजपला अनफॉलो करा; कॉकरोच पार्टीचे संस्थापक भाजपवर भडकले

अध्ययन सुमन यांनी संकल्पना केलेला आणि धर्मेश संगानी यांनी निर्मित केलेला ‘शेखर टुनाइट’ हा कार्यक्रम आता फक्त सेलिब्रिटी टॉक शो राहिलेला नाही, तर मनापासून होणाऱ्या संवादांचं एक खास व्यासपीठ बनत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या उत्स्फूर्त  प्रतिसादानंतर ‘शेखर टुनाइट’ दर शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे. बॉबी देओल यांची खास मुलाखत २२ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us