Bobby Deol : 21 मे रोजी प्रदर्शित होणार बॉबी देओल अभिनीत ‘बंदर’चा धमाकेदार ट्रेलर!
Bobby Deol : निखिल द्विवेदी यांच्या सॅफ्रन मॅजिकवर्क्स आणि झी स्टुडिओ यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बंदर’चे दिग्दर्शन अनुराग कश्यप
Bobby Deol : निखिल द्विवेदी यांच्या सॅफ्रन मॅजिकवर्क्स आणि झी स्टुडिओ यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बंदर’चे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. चित्रपटात बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत दमदार कलाकारांची फळी झळकणार आहे. बहुप्रतिक्षित हा चित्रपट 5 जून 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
‘बंदर’ हा 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक बनला असून चित्रपटाशी संबंधित प्रत्येक नव्या अपडेटमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढत आहे. बॉबी देओल आणि अनुराग कश्यप यांचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असल्याने सुरुवातीपासूनच याबाबत प्रचंड चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या दमदार झलकफितीने आणि पहिल्या गीताने पूर्णपणे विस्कळीत विश्वाची झलक दाखवली होती, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली.
प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना चित्रपटाबद्दलचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. आता निर्माते 21 मे रोजी ‘बंदर’चा भव्य आणि स्फोटक ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत.
चित्रपटाच्या झलकफितीने बॉबी देओल यांचा हटके रेट्रो-रॉकस्टार लूक, गडद दृश्यरचना, भावनिक गोंधळ आणि चित्रपटातील अनपेक्षित जग यामुळे समाजमाध्यमांवर मोठी चर्चा रंगवली होती. आता ट्रेलरमधून प्रेक्षकांना या तीव्र विश्वाची आणखी मोठी झलक पाहायला मिळणार असल्याची अपेक्षा आहे. चित्रपटात सान्या मल्होत्रा, राज बी शेट्टी, सपना पब्बी, सबा आझाद, रिद्धी सेन आणि जितेंद्र जोशी इंद्रजीत आणि नागेश भोसले हेही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
30 वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांची जोडी रंगभूमीवर परतणार-
अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि ‘पाताळ लोक’, ‘कोहरा’ तसेच ‘उडता पंजाब’सारख्या चर्चित कथा लिहिणारे संदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिलेला ‘बंदर’ हा तितकाच गडद, बेधडक आणि अस्वस्थ करणारा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे, जशा प्रकारच्या चित्रपटांसाठी अनुराग कश्यप ओळखले जातात. हा चित्रपट प्रेक्षकांना काय विचार करायचा हे सांगत नाही, तर त्यांना आपल्या जगातून नजर हटवण्याची संधीच देत नाही. ‘बंदर’चे लेखन सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केले असून दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. निखिल द्विवेदी यांच्या सॅफ्रन मॅजिकवर्क्सने झी स्टुडिओ यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बंदर’ 5 जून 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.