Tiger 3 कतरिना अन् भाईजानच्या ‘टायगर-3’ चा धमाकेदार टीझर रिलीज

Tiger 3 कतरिना अन् भाईजानच्या ‘टायगर-3’ चा धमाकेदार टीझर रिलीज

Tiger 3:  सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) चा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ (Tiger 3) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलीवूडची डायनॅमिक जोडी कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा सोबत बघायला मिळणार आहे. टायगर 3 च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. टायगरच्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतानाच आज टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


हा अॅक्शन- पॅक्ड सिनेमा बघण्यासाठी आता चाहते देखील मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहे.मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 त्याच्या अँक्शन चित्रपटाची मेजवानी सगळयांना अनुभवयाला मिळणार आहे. हा अफलातून थ्रिलर आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. तसेच यामध्ये काहीतरी वेगळं असणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. दिवाळीमध्ये रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. टायगर 3 चा टीझर बॉलीवूडमध्ये लक्ष वेधून घेत आहेत.

तसेच हा ब्लॉकबस्टर भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकेल आणि वर्षाच्या अखेरीस विजय सेतुपतीसह प्रदर्शित होणार्‍या कॅटरिनाच्या मेरी ख्रिसमसचीही चाहत्यांना अपेक्षा आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘एक था टायगर’ या फ्रेंचाइजीचा पहिल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला होता. सिनेमात भाईजानला रॉ एजंट टायगर तर कतरिना आयएसआय एजंट झोयाच्या मुख्य भूमिकेत दाखवण्यात आले होते. भाईजान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीने रुपेरी पडद्यावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता.

Aparshakti Khurana: अभिनेता अपारशक्ती खुराणा चमकला अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये

यानंतर भाईजान आणि कतरिनाने २०१७ मध्ये ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या सीक्वलद्वारे पुनरागमन केले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड देखील मोडले आहेत. ‘टायगर ३’ हा लोकप्रिय ‘वायआरएफ स्पाय युनिव्हर्स’चा पाचवा सिनेमा आहे आणि तब्ब्ल ६ वर्षांनंतर भाईजान  आणि कतरिना टायगर आणि झोयाच्या भूमिकेत कमबॅक केल्याचे बघायला मिळाले आहे. आता हा आगामी सिनेमा  गेल्या सिनेमाचे रेकॉर्ड मोडू शकेल की नाही हे बघणं आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube