Download App

बॉलिवूडकरांना भावतोय अहमदनगर जिल्हा; चित्रपटांच्या चित्रकरणाचा कल वाढला

Ahmednagar Bollywood Movie Shooting : गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यासाठी एक सकारात्मक गोष्ट घडायला सुरूवात झाली आहे. ती गोष्ट म्हणजे अहमदनगर जिल्ह्याकडे आता बॉलिवूडकरांचा ओढा वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीच अहमदनगरमध्ये पार पडलेल्या गदर 2 आणि “>पिप्पा या बिग बजेटच्या चित्रपटांच्या शूटिंगच उदाहरण देता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील चित्रीकरणांचं प्रमाण वाढणार आहे. तसेच पर्यटन आणि आर्थिक चक्राला गती मिळणार आहे. ( Bollywood Movies Shooting Increase in Ahmednagar Gadar 2 and Pippa recently shoot )

Sanjay Narvekar Birthday: केवळ ‘देढ फुटिया’ भूमिकेमुळे बदलले अभिनेत्याचे आयुष्य! वाचा अभिनेत्याबद्दल…

अहमदनगर जिल्ह्यात चित्रपटांच्या शूटिंगचा कल का वाढला?

अहमदनगर जिल्ह्यात भौगोलिक विविधता आहे. शहरात सिनेमानिर्मितीचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. तसेच येथील नवख्या आणि अनेख्या संकल्पणा घेऊन चित्रपट लघुपट बनवणाऱ्या तरूणांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामुळे येथे चित्रपट निर्मात्यांना कुशल मनुष्यबळ मिळत आहे. तसेच खर्चही कमी लागत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात चित्रपटांच्या शूटिंगचा कल वाढला आहे.

Akash Choudhary: ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याच्या कारला अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

दरम्यान जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथे चित्रनगरी व्हावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांकडून केली जात आहे. या भागात नैसर्गिक परिस्थिती देखील चित्रकरणाला अनुकूल अशी आहे. त्यामुळे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ते नगरविकास मंत्री असताना त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

जिल्ह्यात कोण-कोणकोणत्या चित्रपटांचे शूटिंग झाले?

यापूर्वी देखील जिल्ह्यात अनेक चित्रपटांचं शूटिंग झाले आहेत. त्यामध्ये अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात अनेकदा बॉलिवूडच्या चित्रपटांचं शूटिंग झाले आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या राम तेरी गंगा मैली त्यानंतर तेथील अंब्रेला फॉल प्रसिद्ध झाला. तसेच अक्षय कुमार आणि शाहरूख सारख्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचं शूटिंग देखील जिल्ह्यात झाले आहे. तर आता अहमदनगरच्या लष्करी भागात तसेच नारायणडोहो येथे गदर 2 आणि पिप्पा या बिग बजेटच्या चित्रपटांचे शूटिंग पार पडलं आहे. त्यामुळे अहमदनगर चित्रपटांचे शूटिंग जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

Tags

follow us