Breaking! 15 राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; दिल्लीकरांना दिलासा! पंजाबमध्ये भीषण स्थिती

Heavy Rain Alert In Panjab Uttar Pradesh Bihar : देशात पुन्हा एकदा पावसाचा कहर माजण्याची शक्यता आहे. 15 राज्यांसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिल्लीकरांना मात्र पुढील काही दिवस दिलासा मिळणार असला, तरी पंजाबमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अनेक राज्यांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्यानंतर, पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
आज दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट (Delhi) दिला असला तरी आता नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत (Weather Update) दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता नाही.आज कमाल तापमान 34°C तर किमान तापमान 24°C नोंदवण्यात (Heavy Rain) आलं. पुढील काही दिवस तापमान असंच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, मागील काही दिवसांत झालेल्या (Uttar Pradesh) पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पंजाबमध्ये पावसाचा इशारा कायम
दुसरीकडे, पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा कायम असून पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 6 आणि 7 सप्टेंबर रोजी गुजरात प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये खूप मुसळधार पाऊस पडू शकतो. तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात 8 सप्टेंबर पर्यंत पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
इतर राज्यांचा हवामान अंदाज
– 10 आणि 11 सप्टेंबर रोजी पूर्व (IMD) उत्तर प्रदेश, हरियाणा, मराठवाडा, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
– 7 सप्टेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि अंदमान-निकोबार बेटांवर पाऊस पडू शकतो.
– 10 आणि 11 सप्टेंबर रोजी छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस होऊ शकतो.
– आसाम आणि मेघालयात 10 आणि 11 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे, तर 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशात हलक्या सरींचा अंदाज आहे.
दक्षिण भारतातही पावसाची शक्यता
– 5 आणि 6 सप्टेंबर रोजी तामिळनाडू, केरळ आणि माहे येथे मुसळधार पाऊस पडू शकतो.
– पुढील 5 दिवस किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा येथे जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे.