Akash Choudhary: ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याच्या कारला अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

Akash Choudhary: ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याच्या कारला अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

Akash Choudhary Car Accident: सततच्या पावसाचा जोर वाढल्याने सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण खूपच वाढत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातात अनेकांचा बळी गेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. (Car Accident) अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ‘भाग्यलक्ष्मी’ (Bhagyalakshmi serial) या सिरियलमधील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता आकाश चौधरी (Akash Choudhary Car Accident) याच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. शनिवारी आकाश आपल्या कारने लोणावळ्याच्या दिशेला जात असताना अचानक एका ट्रकने भरधाव वेगात येत अभिनेत्याच्या कारला जोरात धडक दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


दिलासादायक बातमी म्हणजे या भीषण अपघातामध्ये अभिनेत्याचा थोडक्यात जीव फारशी दुखापत झालेली नाही. अभिनेता आकाश चौधरी याने कार ड्राईव्ह करताना सीट बेल्ट बांधला होता. या अपघातात आकाश बालंबाल बचावला बचावला असला तरी, मात्र आकाशच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो अद्याप या धक्क्यातून सावरू शकला नाही. अजून देखील आकाश या अपघाताच्या आघातातून बाहेर पडू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याशी माध्यमांनी नुकताच संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा अभिनेत्याने या भीषण अपघाताविषयी माहिती दिली आहे.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

आकाश म्हणाला की, ‘ट्रक माझ्या गाडीवर कधी आदळला, ते मला कळलेच नाही. या अपघातामध्ये मला दुखापत झाली नाही. परंतु या अपघाताने आम्हाला हादरवून सोडले आहे. माझी झोप अक्षरशः उडाली आहे. अपघातानंतर मी सुट्टीवर होतो. परंतु रात्री अजिबात झोप येत नव्हती. रात्रभर मी त्या अपघाताचा विचार करत होतो. या अपघातामध्ये मला काही झालं असतं तर.. हाच विचार सतत माझ्या मनात येत आहे. आकाश चौधरीने ट्रकचालकाला त्याच्या निष्काळजीविषयी देखील चांगलंच खडसावल्याचे सांगण्यात येत आहे.

आकाश म्हणाला की, ‘जेव्हापासून मी वैभवी उपाध्याय आणि देवराज पटेल यांच्या अपघाताबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी रस्त्यावर गाडी चालवत असताना खूप घाबरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यांनी तातडीने येऊन चालकाला ताब्यात घेतले आहे. परंतु गाडीवाल्याची अवस्था फारच खराब असल्याने मी माझी तक्रार मागे घेतली आहे. टीव्ही शो व्यतिरिक्त आकाश सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कायम जोडल्याचे दिसून येत असतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube