क्रिकेटच्या मैदानावर ‘ऑलराउंडर’ असलेले स्टार्स आता अभिनयातही ‘किंग’ला देतायत चॅलेंज!

Axar Patel : क्रिकेटमधील उत्कृष्ट ऑलराउंडर्स अक्षर पटेल आणि क्रुणाल पांड्या हे अनेक कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवण्याचं महत्त्व चांगलं जाणतात.

Axar Patel

Axar Patel : क्रिकेटमधील उत्कृष्ट ऑलराउंडर्स अक्षर पटेल आणि क्रुणाल पांड्या हे अनेक कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवण्याचं महत्त्व चांगलं जाणतात. आता तेच ते सिंगर-सॉन्गरायटर किंगला शिकवत आहेत, जो प्राइम व्हिडिओच्या आगामी मालिका ‘लुक्खे’मधून अभिनयात पदार्पण करत आहे. या मालिकेत किंग ‘एमसी बदनाम’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मजेशीर आणि मोकळ्या गप्पांमध्ये, या दोन्ही क्रिकेटपटूंनी भारताच्या लोकप्रिय रॅपर किंगला स्क्रीनवरही तितकाच जबरदस्त परफॉर्मन्स देण्याचं आव्हान दिलं आहे. ते त्याला प्रोत्साहन देत आहेत, मोटिवेट करत आहेत आणि त्याच्या मोठ्या पदार्पणासाठी त्याला पूर्णपणे तयार करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

जमीन वादातून वहिनी-पुतणीची हत्या मग पाठलाग करत पुतण्यावर तलवारीने सपासप वार; सोलापुरात खळबळ

किंगसोबत या मालिकेत राशी खन्ना, पलक तिवारी, लक्ष्यवीर सिंह सरन, नकुल रोशन सहदेव, कृतिका भारद्वाज, शिवांकित परिहार, योगराज सिंह आणि आयशा रज़ा मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक हिमांक गौर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ‘लुक्खे’ ही मालिका 8 मे रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

follow us