Deepika Padukone: गणेशोत्सवात रणवीरच्या कुटुंबात गौराईचं आगमन; दीपिका अन् रणवीर झाले आई-बाबा

  • Written By: Published:
Deepika Padukone: गणेशोत्सवात रणवीरच्या कुटुंबात गौराईचं आगमन; दीपिका अन् रणवीर झाले आई-बाबा

Deepika and Ranveer Welcome a Baby Girl : बॉलिवूड इंडस्ट्रीतलं ग्लॅमरस कपल म्हणून ओळखल जाणारं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अखेर गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनने (Deepika) मुलीला जन्म दिला आहे. पापारराझी अकाउंटवरुन ही बातमी समोर आली आहे. बाळाच्या आगमनाने पादुकोण आणि भवनानी परिवारात मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतय.

Deepika Padukone : आई झाल्यावर दीपिका घेणार कामातून ब्रेक, नाकारला हॉलिवूडचा मोठा प्रोजेक्ट?

दीपिका पादुकोणननं फेब्रुवारी महिन्यात ती आई आणि रणवीर बाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. तेव्हापासून दोघांच्याही चाहतावर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता. आजच दीपिका मुंबईतल्या आर एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाली होती. त्यानंतर रणवीरचे कुटुंबिय देखील हॉस्पिटमध्ये आलं होतं. तर काल त्यांनी कुटुंबासह सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं होतं.

दीपिका जेव्हा जेव्हा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसायची तेव्हा तिच्या प्रेग्नंसी लूकची बरीच चर्चा व्हायची. तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधले लूक खूप व्हायरल झालेले. याशिवाय ती दीपिका गरोदरपणाच्या काळात बरेचदा आपल्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींसोबत वेळ घालवताना दिसलेली. रणवीरही तिची बरीच काळजी घेत होता.

दीपिका आणि रणवीरची लव्हस्टोरी

दीपिका आणि रणवीरच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर ‘रामलीला’ चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झालेली. रणवीर आणि दीपिका पादुकोणची पहिली भेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली. यानंतर बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube