मोठी बातमी : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू

Sanjay Gupta Passes Away : बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. 'कांटे', 'मुसाफिर' आणि 'शूटआउट ॲट लोखंडवाला

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Sanjay Gupta Passes Away

Sanjay Gupta Passes Away : बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. ‘कांटे’, ‘मुसाफिर’ आणि ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ सारख्या चित्रपटांसाठी त्यांची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख होती. माहितीनुसार, राहत्या घरी  बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांना डोक्याला दुखापत झाली होती, जी त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, आतापर्यंतच्या तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नाही. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही दुखापतीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

संजय गुप्ता यांच्या निधनावर बॉलिवूडमध्ये शोक

संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांचे निकटवर्तीय अशोक पंडित यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, “ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मला नुकतेच समजले की माझे जवळचे मित्र आणि अनुभवी दिग्दर्शक संजय गुप्ता आता आपल्यात नाहीत. घरी असताना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. एक प्रतिभावान व्यक्ती अकाली आपल्यातून निघून गेली आहे. ते एक उत्तम कथाकार, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटसृष्टीवर मनापासून प्रेम करणारे निर्माते-दिग्दर्शक होते. त्यांच्या जाण्याने आपल्या उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. मित्रा, तुझी खूप आठवण येईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि प्रियजनांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”

संजय गुप्ता यांचा शेवटचा चित्रपट

‘द मिरांडा ब्रदर्स’ (The Miranda Brothers) हा त्यांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट होता.  हा चित्रपट 2024 मध्ये पूर्ण झाला आणि त्यात हर्षवर्धन राणे आणि मिझान जाफरी प्रमुख भूमिकेत होते.  संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती केली होती.

follow us