Gadkari मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार गडकरींची भूमिका

Gadkari मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार गडकरींची भूमिका

Gadkari : गडकरी (Gadkari) चित्रपटामध्ये कोणता अभिनेता मंत्री नितीन गडकरींची (Nitin Gadkari) भूमिका साकारणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती. त्यानंतर अखेर ही उत्सुकता संपली आहे. कारण अखेर त्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील ‘गडकरी’ यांचा चेहरा समोर आला आहे.

‘हा’ अभिनेता साकारणार गडकरींची भूमिका

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले ही साकारणार आहे. नितीन गडकरी… (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव आणि महाराष्ट्राचे लाडके नेते. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ (Highway Man of India) अशी त्यांची ख्याती आहे. देशाच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ (Gadkari Marathi Movies) हा रंजक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

दरम्यान नुकाताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील आला आहे. टीझरची सुरुवातच ”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टिझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या सिनेमाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. तर प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना 27ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube