Gautami Patil : तड तड तड तड.., गौतमी पाटीलच्या भन्नाट डान्सची सर्वांनाच भुरळ

Gautami Patil : तड तड तड तड.., गौतमी पाटीलच्या भन्नाट डान्सची सर्वांनाच भुरळ

अमोल भिंगारदिवे

अहमदनगर : गौतमी पाटील हे नाव काय आता महाराष्ट्राला नवीन नाही. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवलेल्यांपैकी गौतमी पाटील एक आहे. तिचं नृत्य पाहिल्यानंतर चांगल्यालाही भूरळ पडेल, हे मात्र नक्की, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टींमुळे गौतमी पाटील चांगलीच फार्ममध्ये आलीय. एखादी डान्सर लहानांपासून वयोवृद्धांपर्यंतच्या सर्वांनाच भुरळ पाडू शकते हे तिने आपल्या नृत्याच्या जोरावर सिद्ध केलंय.

आता प्रत्येकजण वाढदिवस, हळदी समारंभ, अन् लग्नाच्या वरातीसाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करायला लागलायं. पाहता पाहता ग्रामीण भागासह आता मोठ्या शहरांमध्येही तिची क्रेझ चांगलीच वाढू लागली. गौतमीचा कार्यक्रम अन् तुफान गर्दी, राडा, धुडगूस असं हे सुत्रच तयार झालंय. गौतमी पाटील कार्यक्रमात केलेल्या नृत्यांचे रिल्स व्हिडिओज तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शेअर करीत असते. महाराष्ट्रातला तिचा चाहतावर्ग टक लावून तिचे हे रिल्स व्हिडिओज पाहत असतो. तिच्या नृत्यावर लाखोंच्यावर व्ह्युवर्स अन् कमेंटचा वर्षाव केला जातो.

गौतमीने शेअर केलेला व्हिडिओ कायमच चर्चेत येत असतो. अशाच एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘तड तड तड तड चालतयं…’, ‘काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात’ गाण्यांवर नृत्य केलेला तिच्या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. लाईक्स, कमेंटसह मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून शेअर केला जात आहे.

एवढंच नव्हे तर चंद्रा, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पाटलांचा बैलगाडा, झाला मला प्रेम झाला, अशा विविध गाण्यांवरील गौतमीच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खरोखर धुमाकूळ घातला आहे. गौतमीने शेअर केलेल्या सर्वच व्हिडिओला नेटकऱ्यांकडून जोरदार वाव मिळत असून त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. तिचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दरम्यान, अनेक वादांत अडकली तरीही जोमाने उभी राहत चाहत्यांच्या मनावर गौतमी पाटील अधिराज्य गाजवित आहे. गौतमीचे सोशल मीडियावर असंख्य पेज आहेत. गौतमीचे सर्वच पेज चाहत्यांनी फॉलो केले असून पेजच्या माध्यमातून तिचे व्हिडिओ चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात. गौतमीचं सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम गाणं प्रदर्शित झाल्यानंतर गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यानंतर खरोखर गौतमीने चाहत्यांचं मार्केट जाम केलंय, असंच म्हणावं लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube