दिवसातून एकदा तरी फोन कर आणि फक्त हॅलो बोल; हेमांगी कवीची मातृदिनानिमित्त आईबद्दल खास आठवण
Hemangi Kavi - आईबद्दल किती बोलू हेच कळत नाही. सध्या माझी आई गावी असते आणि तिचं एकच म्हणणं असतं “दिवसातून एकदा तरी फोन कर आणि फक्त हॅलो बोल.” कारण रोज माझा आवाज ऐकून तिला खूप बरं वाटतं.
Hemangi Kavi On Mother day: ‘सन मराठी’ वरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ (Tu Anolkhi Tari Sobati) या मालिकेतील निलांबरी म्हणजेच अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) मातृदिनानिमित्त आईबद्दल खास आठवण शेअर केली आहे.
हेमांगी कवी म्हणाली की, आईबद्दल किती बोलू हेच कळत नाही. सध्या माझी आई गावी असते आणि तिचं एकच म्हणणं असतं “दिवसातून एकदा तरी फोन कर आणि फक्त हॅलो बोल.” कारण रोज माझा आवाज ऐकून तिला खूप बरं वाटतं. मनोरंजन क्षेत्रात काम करताना सुरुवातीला तिचा पाठिंबा नव्हता, पण माझं काम पाहिल्यानंतर तिचा पूर्ण सपोर्ट मला मिळाला. “तू अनोळखी तरी सोबती ही” मालिका पाहिल्यानंतर ती मला म्हणाली, “किती ओरडतेस, चिडचिड करतेस… तुला याचा त्रास होत असेल, स्वतःची काळजी घे.” तिच्या त्या शब्दांतही तिची काळजी स्पष्ट दिसून येते.”
“‘निलांबरी’ हे माझं पात्र ग्रे शेडचं आहे. त्यामुळे राग, चिडचिड, खोटे प्लॅन्स हे सगळं साकारावं लागतं. हे पाहून आईला माझी काळजी वाटणं अगदी साहजिक आहे.मदर्स डे हा फक्त एक दिवस असतो. पण आई मात्र जन्मापासून आपल्यासाठी जगत असते. ती आपल्याला एका क्षणासाठीही दूर करत नाही. पण लग्नानंतर एका मुलीचं आयुष्य बदलून जातं…आईपासून दूर जावं लागतं. तरीही आमचं नातं आणि आमचा बॉण्ड खूप खास आहे. आईला फ्लाईटमध्ये बसवून गोव्याला घेऊन जाण्याची माझी इच्छा अजून बाकी आहे. आणि ती मी लवकरच पूर्ण करेन.”