एका वर्षाचा प्रवास ठरला ‘गोल्डन माइलस्टोन’, होम्बले फिल्म्सकडून ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1’च्या यशाचा जल्लोष

चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बले फिल्म्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानत या यशाचा आनंद साजरा केला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 03T110933.359

success of ‘Kantara: A Legend Chapter 1’ : महत्त्वाकांक्षी प्रीक्वेलपासून जगभरात विक्रमी कमाई करणाऱ्या ब्लॉकबस्टरपर्यंतचा प्रवास पूर्ण करत ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1’ या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण केलं आहे. या खास निमित्ताने चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बले फिल्म्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानत या यशाचा आनंद साजरा केला आहे. होम्बले फिल्म्स हे भारतातील आघाडीच्या पॅन-इंडिया प्रोडक्शन हाऊसेसपैकी एक असून, या बॅनरने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक मोठे आणि यशस्वी चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार निर्मितीसाठी या संस्थेने अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही मिळवले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या SIIMA Awards मध्येही ‘कांतारा’ने शानदार कामगिरी करत तब्बल 9 पुरस्कार आपल्या नावावर केले. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चा प्रीक्वेल म्हणून ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या दमदार कथानकाला रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्या प्रभावी अभिनयाची जोड मिळाली. विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा यांच्या निर्मितीत होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेला हा चित्रपट प्राचीन कदंब काळातील, वसाहतवादी राजवटीपूर्वीच्या तटीय कर्नाटकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन

पवित्र जंगलाच्या पौराणिक उत्पत्तीपासून मानवी लालसेपर्यंत आणि लोककथांमधील दैवी मुळांपर्यंतचा अनोखा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. भावनिक कथानक आणि दमदार अॅक्शन यांचा प्रभावी मिलाफ हे चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यासोबतच बी. अजनीश लोकनाथ यांनी दिलेल्या संगीताचंही प्रेक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. भारतासोबतच जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होम्बले फिल्म्सने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत जगभरातील प्रेक्षकांचे आभार मानले.

होम्बले फिल्म्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1’च्या शानदार ब्लॉकबस्टर प्रवासाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आपल्या मुळांचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा उत्सव साजरा करणारा हा एक अद्भुत प्रवास ठरला. जगभरातील प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हा प्रवास आणखी खास झाला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ‘कांतारा’च्या प्रवासातील हा अध्याय कायमस्वरूपी आठवणीत राहिला आहे. होम्बले फिल्म्सने कायमच भारतीय संस्कृती, परंपरा आणि आपल्या मातीशी जोडलेल्या कथांना प्रोत्साहन दिलं आहे. ‘कांतारा’ ही त्याचं उत्तम उदाहरण मानली जाते. या चित्रपटाने समृद्ध सांस्कृतिक कथा मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडण्यासोबतच अशा विषयांवर आधारित चित्रपटांसाठी नवा मार्गही तयार केला.

फ्लायदुबईच्या कॉकपिटमध्ये हल्ल्याचा आरोप, हमाम अलहमामी कोण? उड्डाणबंदीपासून कॉकपिटपर्यंतचा प्रवास

KGF फ्रँचायझी, ‘कांतारा’, ‘सालार’ फ्रँचायझी आणि ‘महावतार नरसिम्हा’ यांसारख्या पॅन-इंडिया चित्रपटांच्या माध्यमातून होम्बले फिल्म्सने भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय ‘हनुमान अंश’सारख्या आध्यात्मिक चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाच्या दिशेनेही प्रोडक्शन हाऊस पुढे जात आहे. मोठ्या पॅन-इंडिया प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत नवे मानदंड निर्माण करण्याचा होम्बले फिल्म्सचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातही या बॅनरकडून अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘सालार: भाग 2 – शौर्यंगा पर्व’, ‘महावतार परशुराम’, ‘सूर्या 48’, ‘येथो का नाय’ तसेच ऋतिक रोशनसोबतचा आगामी प्रोजेक्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता होम्बले फिल्म्सच्या आगामी चित्रपटांकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

follow us