Jawan Chaleya Song Release: किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाचं गाणं प्रदर्शित; ‘चलेया’वर थिरकला शाहरुख
Jawan Chaleya Song Out: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मोस्ट अवेटेड ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचा गेल्या काही दिवसापासून प्रीव्ह्यू प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये किंग खानच्या अनेक वेगवेगळ्या लूकनं चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. तसेच ‘जवान’ या सिनेमामधील ‘जिंदा बंदा’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. आता या सिनेमामधील ‘चलेया’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
किंग खानच्या ‘जवान’ या सिनेमामधील ‘चलेया’ हे गाणं सोशल मीडियावर (Social media) शेअर करण्यात आले आहे. या गाण्याला त्यानं कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, “इश्क हो बेहिसाब सा ,बेपरवाह, बेहद सा, कुछ ऐसा है जवान का प्यार.” किंग खान हा बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून देखील ओळखला जात असतो. चलेया या गाण्यामधील किंग खान आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यामधील रोमान्सनं चाहत्यांचे चांगलाच लक्ष वेधत असल्याचे पाहायला आहे. किंग खान आणि नयनतारा यांची जवान सिनेमामधील केमिस्ट्री बघण्यास चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.
गेल्या काही दिवसापासून जवान या सिनेमातील जिंदा बंदा हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आले होते. तर ‘जिंदा बंदा’ या गाण्यामध्ये किंग खानबरोबर सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील डान्स करत असताना दिसून आली आहे. या गाण्याला कमेंट करत अनेकांनी या गाण्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. आता ‘चलेया हे जवान सिनेमामधील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.
Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; सिद्धार्थने अरेंज केली आई-बाबांची पहिली फॉरेन टूर
जवान (Jawan) या सिनेमात किंग खानबरोबर नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा हे कलाकार मुख्य भूमिका साकारत असताना दिसणार आहेत. तसेच दीपिका पादुकोण देखील या सिनेमात कॅमिओ रोलमध्ये दिसून येणार आहे. हा सिनेमा ७ सप्टेंबर दिवशी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.