Kangana Ranaut: ‘ओपनहाइमर’चं कंगनाकडून तोंडभरुन कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Kangana Ranaut: ‘ओपनहाइमर’चं कंगनाकडून तोंडभरुन कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Kangana Ranaut Reviews Oppenheimer: ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या सिनेमाची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. ओपनहाइमर या हलक्या सिनेमाने अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत असल्याचे पाहायला मिळाले आहेत. नुकताच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील ओपनहाइमर या सिनेमाबद्दल खास व्हिडीओ शेअर करत कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


कंगनानं सोशल मीडियावर (Social media) शेअर केलेल्या व्हिडीओत ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. व्हिडीओत ती व्हाईट टॉप, मोकळे केस आणि न्यूड मेकअप अशा लूकमध्ये ती दिसून येत आहे. कंगना या व्हिडीओत सांगत आहे की, ‘मित्रांनो, मी ओपनहाइमर सिनेमा बघून आले आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेसाठी अणुबॉम्ब बनवणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञाची ही कथा आहे.

कंगनानं या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे, ‘ख्रिस्तोफर नोलनचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम. हा आपल्या काळात अतिशय महत्वाचा सिनेमा आहे. मी खूप एक्सायडेट आहे. या सिनेमामध्ये मला आवडणाऱ्या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाले आहे. मला भौतिकशास्त्र आणि राजकारणाची आवड आहे. माझ्यासाठी हा सिनेमा खूप महत्वाचा आहे. अप्रतिम!! P.s. वरील व्हिडीओबद्दल आत्ताच लक्षात आले आहे की, मला असे सांगायचं आहे की, राष्ट्रीयतेऐवजी राष्ट्रवाद वाढतो.’ कंगनाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.

Ishq Ka Asar : तुमचे क्षण सुंदर करायला आलंय, स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानीचं नवं गाणं…

कंगनाचा (Kangana Ranaut) ‘धडक’ हा सिनेमा गेल्या काही महिन्याअगोदर रिलीज करण्यात आला आहे. आता कंगना ही ३ आगामी सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ती तेजस, इमर्जन्सी आणि चंद्रमुखी 2′ या सिनेमामध्ये दिसून येणार आहे. कंगनाच्या या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे.

कंगनाचे एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा पहिला सिनेमा गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा ऍमेझॉन प्राइम (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube